Solapur News : रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी 75 कोटीचा निधी; समाधान आवताडे

दोन्ही तालुक्यातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने विविध रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे
Solapur 75 crore fund for road strengthening samadhan autade politics
Solapur 75 crore fund for road strengthening samadhan autade politicssakal

मंगळवेढा : पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून 75 कोटीचा रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती समाधान आवताडे यांनी दिली.

Solapur 75 crore fund for road strengthening samadhan autade politics
Solapur News: सोलापूर शहरात कोरोनाचे १४ रुग्ण! मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरच्या संपर्कातून आठ जण पॉझिटिव्ह

दोन्ही तालुक्यातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने विविध रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे झाले. सदर रस्त्यांच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत यासाठी आवताडे यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली.

Solapur 75 crore fund for road strengthening samadhan autade politics
Solapur : बलात्काराच्या केसमध्ये हलगर्जीपणा, ‘एपीआय’,‘पीएसआय’सह दोन हवालदार निलंबित

या मागणीची राज्य पातळीवर दाखल घेऊन हा निधी मंजूर झाला मंजूर रस्ते पुढीलप्रमाणे- कागष्ट ते हुलजंती, खर्डी ते तपकिरी (शे), गुंजेगाव ते लक्ष्मी दहिवडी, माचणूर ते रहाटेवाडी, बोराळे ते मंगळवेढा, बाजीराव विहीर - गादेगाव - कोर्टी - बोहाळी - खर्डी - तनाळी, आंधळगाव ते पाटखळ, खर्डी - तावशी - एकलासपूर, भालेवाडी - डोणज - नंदुर, भोसे - रड्डे - निंबोणी - मरवडे, हाजापूर - जुनोनी - हिवरगाव ते तळसंगी,

Solapur 75 crore fund for road strengthening samadhan autade politics
Solapur News: काळ्या हळदीच्या अमिषातून अकलूजच्या श्रीमंत व्यक्तीची ६५ लाखांची फसवणूक! भिवंडीतील ६ संशयित जेरबंद

कासेगाव ते तावशी, ब्रह्मपुरी - मुंढेवाडी - भालेवाडी, कासेगाव ते टाकळी विसावा, जालिहाळ ते भाळवणी, कासेगाव ते तपकिरी शेटफळ , बठाण ते साखर कारखाना, तनाळी ते शेटफळ, हुलजंती ते सलगर खु - सलगर बु - उमदी, उपरी ते गादेगाव, लक्ष्मी दहिवडी ते प्ररामा, कोर्टी ते माळीवस्ती, हिवरगाव ते भाळवणी, कौठाळी चौफाळ ते धुमाळ वस्ती,

लेंडवे चिंचाळे ते आंधळगाव रस्ता, सलगर बु ते भुयार, तांडोर ते प्रजिमा, नंदुर ते बोराळे, येळगी ते प्ररामा, मरवडे ते कालिबाग वस्ती, नंदेश्वर ते शिरसी, भोसे ते शिरनांदगी, खोमनाळ ते फटेवाडी, हुलजंती ते येळगी, चिक्कलगी ते येळगी, डोंगरगाव ते खोमनाळ, भागवत माने वस्ती ते मारापूर या गावातील रस्त्याची सुधारणा या मंजूर निधीतून करण्यात येणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com