Solapur : लोकसभेपूर्वी विमानसेवेचे भाजपसमोर आव्हान

सोलापूरकरांना प्रतीक्षाच; सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी पाडूनही विलंब
Solapur news
Solapur newsesakal

सोलापूर : सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीमुळे होटगीरोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू होत नाही हा वर्षानुवर्षे सुरू असलेला दावा/आरोप १५ जून २०२३ रोजी थांबला. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडली अन्‌ विकासाला अडसर ठरल्याच्या आरोपातून कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी सुटले. चिमणी पडली, काडादी सुटले परंतु लोकसभेच्या मतदानापूर्वी सोलापुरातून विमानसेवा सुरू करून दाखविण्यासाठी भाजप आता अडकल्याचे दिसत आहे.

Solapur news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

चिमणी पाडायची कोणी? जिल्हाधिकाऱ्यांनी की महापालिका आयुक्तांनी याच प्रश्‍नाचे उत्तर अनेक वर्षे सुटत नव्हते. माजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून हा विषय अखेर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे आला, त्यांनी १५ जून रोजी चिमणी पाडून दाखविली. होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी १५ जून ते नोव्हेंबर अखेरपर्यंत फक्त चर्चा, बैठका आणि फाईलींची फिरवाफिरवी एवढ्याच गोष्टी झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी होटगीरोडवरून विमान नाही उडल्यास कारखान्याच्या सभासदांना/सोलापूरकरांना काय उत्तर देणार? याची जाणीव झाल्याने आता सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी युद्ध पातळीवर तयारीला लागले आहेत.

Solapur news
Parenting Tips : तुमची मुलं लग्नासाठी नकार देतायत? मग या गोष्टी कारणीभूत असू शकतात

लोकसभेचे तिकीट, संसदेचे तिकीट हे सोलापुरातील विमानसेवेच्या तिकिटावर अवलंबून दिसत आहे. नोव्हेंबर अखेर सुरू झालेली कामे पूर्ण होण्यासाठी निविदेत ८ ते ९ महिन्यांचा कालावधीत दिला आहे. ही कामे सहा महिन्यात संपविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करून तीन महिन्यात (खासदारकीच्या मतदानापूर्वी) विमानसेवा सुरू करण्यासाठी खासदार महास्वामी प्रयत्नशील आहेत. कामे पूर्ण करणे, विमानसेवेचा परवाना मिळविणे, विमानसेवा देण्यास कंपन्या तयार करणे, सोलापूरकरांना सोईस्कर असलेल्या वेळेत व सोईस्कर असलेल्या ठिकाणापर्यंत सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचे मोठे आव्हान सध्या सत्ताधारी भाजपसमोर दिसत आहे.

Solapur news
Vastu Tips : घरातील दागिन्यांची दिशा बदला, घरात सोन्या-नाण्याची कमी पडणार नाही

कारखान्याला दहा कोटींचा खर्च

कारखान्याची चिमणी पाडल्यानंतरही कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी शांततेच्या मार्गाने, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कारखाना सुरू केला आहे. त्यासाठी दहा कोटींच्या आसपास त्यांना खर्च आला आहे. या परिसरातील इतर कारखान्यांपेक्षा जास्तीचा ऊस दरकाडादी यांनी दिला आहे. चिमणी पडल्यानंतर सिद्धेश्वर कारखाना परिवाराने व काडादी यांनी केलेली मात सभासदांमध्ये सहानभुतीची भावना निर्माण करून गेली आहे.

माढ्यात पुन्हा निंबाळकर? सोलापुरात शांतता

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुण्यात माढ्यातील उमेदवारीचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. देशातील टॉप पन्नासच्या खासदारांमध्ये निंबाळकर आहेत, त्यांना परत संधी दिल्यास ते २०१९ पेक्षा दुप्पट मताधिक्याने विजयी होतील, असा विश्‍वास त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला. माढ्याच्या उमेदवारीचे संकेत भाजपने दिले आहेत. सोलापुरातील उमेदवारीचे संकेत मात्र अद्यापही मिळालेले नाहीत. खासदार महास्वामींच्या जात प्रमाणपत्राचा प्रलंबित विषय असतानाही शेवटच्या टप्प्यात विमानसेवेसाठी अचानक घेतलेला पुढाकार, माजी खासदार साबळेंचे वाढलेले सोलापूरवरील लक्ष, माजी खासदार शरद बनसोडे यांना भेटण्यासाठी मतदार संघातून जाणारे कार्यकर्ते, यामुळे सोलापुरातील भाजपच्या उमेदवारीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com