सोलापूर : जागा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करणार : आयुक्त पी. शिवशंकर

अधिकारी, लिपिकांचे बोगस करारपत्र!
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporationsakal

सोलापूर :  इंडो-तिबेटियन वूलन मार्केट असोसिएशनला जागा देण्यासाठी दहा वर्षांचे बोगस करारपत्र करून परस्पर जागेची कब्जा पावती दिल्याप्रकरणी महापालिकेच्या बी. बी. नरोटे, राजकुमार कावळे या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून यांच्यासह स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आय. के. शेरदी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

शहरातील नॉर्थकोट कंपाउंड लगत असलेल्या पार्क चौकातील जागा गेल्या अनेक वर्षांपासून इंडो-तिबेटियन वूलन मार्केट असोसिएशन अंतर्गत स्वेटरसह वूलनचे इतर कपडे विक्री व्यवसाय करण्यासाठी देण्यात आली आहे. दरम्यान, या जागेचा करार संपुष्टात आला आहे. असोसिएशनला तेथील जागा मुदतवाढ द्यावयाची होती. मुदतवाढ देण्यासाठी सर्वसाधारण सभा अथवा आयुक्तांच्या उपसमितीची सक्षम मान्यता घेणे आवश्यक आहे. आयुक्त व भूमी- मालमत्ता अधिकारी यांना कोणतीही कल्पना न देता, सक्षम मान्यता न घेता दहा वर्षांसाठी रजिस्टर करून मुदतवाढ देण्यात आली.

अधीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांनी सहाय्यक आयुक्त, उपायुक्त व आयुक्त यांना कोणतीही माहिती व सूचना न देताच हा मुदतवाढीचा करार परस्पर केला, तसेच दहा वर्षे मुदतीवर जागा देण्याची कब्जा पावतीही दिली. याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ही खळबळजनक बाब निदर्शनास येताच आयुक्तांनी कठोर पावले उचलत स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आर. के. शेरदी, वरिष्ठ मुख्य लिपिक बी. बी. नरोटे, भूमापक राजकुमार कावळे या तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

विभागीय चौकशी करणार

अधिकारी, मक्तेदार अन्‌ व्यापाऱ्यांचा सुरू असलेला संगनमताचा गैरकारभार आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली. भूमी व मालमत्ता विभागात यापूर्वी असे अनेक गैरकारभार झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना, मक्तेदारांना विविध प्रकारचे अभय मिळत असल्याचा संशय आता या प्रकरणानंतर आणखीनच बळावला आहे. या प्रकरणानंतर भूमी व मालमत्ता विभागाची विभागीय चौकशी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com