

Solapur Municipal Corporation Takes Control of Community Hall After Inquiry Confirms Unauthorized Church Use in Bapujinagar
sakal
सोलापूर : शहरातील बापूजी नगरमधील समाजमंदिराचा चर्च म्हणून वापर सुरू असल्याचे महापालिकेच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची तक्रार हिंदू जनजागृती समितीने केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता समाजमंदिराचा वापर चर्च म्हणून होत असल्याचे स्पष्ट झाले. यातून धार्मिक तेढ निर्माण होण्यासारखी परिस्थिती असल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आल्याने गुरुवारी (ता. ३) महापालिकेने समाजमंदिराला सील लावून जागा ताब्यात घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.