

Congress in-charge Mohan Joshi and district president Satling Shatgar during the candidate interview session in Solapur.
सोलापूर : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती उद्या (सोमवार, ता. १०) सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत काँग्रेस भवनमध्ये होणार आहेत. मुलाखतीसाठी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी मोहन जोशी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. खासदार प्रणिती शिंदे व प्रभारी जोशी यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी दिली.