
माळीनगर: मागील गाळप हंगाम संपून सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. आगामी ऊस हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तरीही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत एफआरपी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक थकीत एफआरपी असल्याचे साखर आयुक्तालयाकडील अहवालावरून दिसते.