
Record 16 Million Ton Sugarcane Crushing Expected in Solapur This Year
Sakal
-भारत नागणे
पंढरपूर: यंदाच्या वर्षी समाधानकार पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यात ऊस उत्पादनात मोठी वाढ अपेक्षीत आहे. किमान 150 ते 160 लाख टन उसाचे गाळप होईल असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि महापूरमुळे जवळपास 10 ते 15 लाख टन ऊसाचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी ही समोर आली आहे. आता पर्यंत सोलापूर विभागातील 40 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.