Solapur : फिश टँकची क्रेझ, थंडीत काळजी महत्त्वाची

थंडीमुळे मासे मरण्याच्या प्रमाणात वाढ; प्रजातीनुसार हिटर आवश्यक
Solapur  news
Solapur newsesakal

सोलापूर : अलीकडे आपले जग मॉडर्न होत चालले आहे. त्यामुळे अनेक गोष्टी आपोआप अवलंबल्या जात आहेत. यातच फिश टँकचीही क्रेझ वाढत आहे. वास्तुशास्त्र तर आहेच पण हादेखील मॉडर्न लाइफस्टाइलचा एक भाग बनला आहे. परंतु थंडीत याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Solapur  news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

वास्तू शास्त्रानुसार घरात फिश टॅंक ठेवावे असे सांगितले जाते. तो देखील शक्यतो ईशान्य कोपऱ्यात असावा. त्यात नऊ ते दहा मासे असावेत. एक तरी काळा मासा असावा, असे नियम असले तरी अशा बदलत्या हवामानात त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हवामान बदलाचा जसा माणसांवर व्हायरल इन्फेक्शन होते, तसे या माश्यांवरही होतो, त्यासाठी उपाय केले तर माशांचे आयुर्मानही वाढते. थंडीत ऑक्सिजन पुरवठा अत्यावश्यक असून तो २४ तास चालू ठेवावा. नळाला येणाऱ्या पाण्यात क्लोरिन आणि अमोनिया असतो.

Solapur  news
Parenting Tips : तुमची मुलं लग्नासाठी नकार देतायत? मग या गोष्टी कारणीभूत असू शकतात

त्यामुळे सात ते आठ दिवस साठवलेले पाणी टॅंकमध्ये वापरावे. ताजे आलेले पाणी वापरू नये. सुरवातीला टँकमध्ये पाणी भरून सर्व जरुरीचे केमिकल टाकून आणि फिल्टर लावून दोन दिवस (४८ तास) चालू करून ठेवावा म्हणजे माश्यांना पोषक वातावरण तयार होते. माशांच्या प्रजातीनुसार हिटर लावावा. कारण काही मासे गरम पाण्यात किंवा ठराविक तापमानात राहतात. गोल्ड फिश नामक मासे सहसा घरी पाळण्यासाठी सोपे असतात. त्यांना हिटरची आवश्यकता नसते.

Solapur  news
Vastu Tips : घरातील दागिन्यांची दिशा बदला, घरात सोन्या-नाण्याची कमी पडणार नाही

टँकमधील फिशची अशी घ्या काळजी

सुरवातीच्या काळात दर आठवड्यातून एकदा पाणी बदलावे.

माशांची विष्ठा अमोनिया तयार करते, जो घातक असतो, ज्यामुळे मासे मरतात.

संपूर्ण पाणी काढून टाकू नये. २५% पाणी काढून टाकून तेवढेच पाणी पुन्हा भरावे.

पाणी संतुलित करणारी द्रव्ये टाकावीत.

सर्व पाणी काढल्यास टॅंकमध्ये असंतुलन होऊन मासे मरतात.

चपाती, भात टाकू नये, एक चिमूटभर फिश फूड टाकावे.

जास्त फिश फूड टाकल्यास पण मासे दगावतात.

एक्वेरियममध्ये आणि आजूबाजूला प्रकाश ठेवावा

थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये, १२ तास किंवा त्यापेक्षा कमी वेळेसाठी लाइट लावा

थंडीमुळे मासे मरतात. त्याच्या शरीरावर पांढरे डाग पडतात. त्याला फंगस म्हणतात. यासाठी १ ते २ मिलिलिटर निळे औषध टाकावे. काही वेळ फिल्टर लावावा. मासे मेल्यावर पाणी बदलूनच ही क्रिया करावी. मासे मेल्याने घाबरून जाऊ नये. फिल्टरचा स्पंजही धुवून घ्यावा.

- विजयालक्ष्मी कोल्हापुरे, विजयालक्ष्मी ॲक्वेरिअम मालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com