Excited passengers at Solapur Airport as flights to Goa and Mumbai record full bookings — Air travel craze grips the city!

Excited passengers at Solapur Airport as flights to Goa and Mumbai record full bookings — Air travel craze grips the city!

Sakal

सोलापूरकर विमान प्रवासाच्या प्रेमात! 'साेलापूर-गाेवा विमानसेवा तीन महिने फुल्ल'; साेलापूर-मुंबईसाठी ४ दिवसांची ९० टक्के तिकिटे बुक

Solapur Takes to the Skies: दिवाळी सुट्टी असल्याने गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. सोलापूरहून गोव्यास जाण्यासाठी २७ ऑक्टोबरनंतर सर्वच दिवशी ९० टक्के फ्लाइट फुल्ल आहेत. नोव्हेंबर महिन्यात ३, ५, ७, ९, २१, २३ व २६ नोव्हेंबर रोजी फ्लाइट फुल्ल आहेत.
Published on

-विठ्ठल सुतार

सोलापूर: सोलापूर-गोवा विमानसेवेस प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळीनंतर सर्वच दिवशी तिकीट बुक आहेत. तर नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांत ९० टक्के तिकिटे बुक झाली आहेत. डिसेंबर महिन्यातील सर्वच दिवस तिकिटे बुक असल्याचे तिकीट बुकिंग एजन्सीकडून सांगण्यात आले. गोव्याबरोबरच २१ ते २४ ऑक्टोबर या तीन दिवसांची मुंबई-सोलापूर व सोलापूर-मुंबई सेवाही फुल्ल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com