सोलापूर : विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज

सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावभेट
विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज
विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज sakal

वडाळा : २०५० मध्ये जग हे भूकबळीला सामोरे जाईल, असे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे आणि हे संकट टाळायचे असेल तर शेतीचे आरोग्य जपले गेले पाहिजे. यासाठीच या स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच ३६ पिकांसाठी ९०० गावांत फार्मर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीकनिहाय शेतकऱ्यांना गट स्थापन करण्यात येणार आहे. विषमुक्त शेती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अविनाश पोळ यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान केले.

अभिनेता अमीर खान यांचा सहभाग असणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या वतीने आता ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची माहिती देण्यासाठी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी दोन दिवस उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, कळमण, वांगी येथे मार्गदर्शनपर भेट दिली. पाणी फाउंडेशन या जलसंधारणाच्या स्पर्धेमुळे राज्यात मोठी जलक्रांती झाली. कित्येक गावे टँकरमुक्त झाली. सरकारला जे जमले नाही. ते या स्पर्धेने करून दाखवले. यानंतर फाउंडेशनने समृद्ध गाव ही स्पर्धा आयोजित केली होती. मात्र, कोरोना कालावधीमुळे त्याला अपेक्षित यश आले नाही. यावर्षीपासून फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी फार्म कप स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

शेतकरी गट हा स्पर्धक

सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये शेतकरी गट हा स्पर्धक असणार आहे. पिकनिहाय गट तयार केले जाणार असून यामध्ये २० शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. पाणी फाऊंडेशनकडून संबंधित पिक उत्पादनासाठी सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या शेतकरी गटाला त्या पिकातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे व यशस्वी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना वीजपुरवठा पेरणी इथपासून औषध उपचार काढणी यासह सर्व बाबींवर मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

विषमुक्त शेतीसाठी प्रयत्न

या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना एकात्मिक कीडनियंत्रण हा सारखे प्रयोग राबवून कमीत कमी रासायनिक निविष्ठा व औषधे यांचा वापर करत विषमुक्त शेतीमाल उत्पादित करण्यासाठी फाउंडेशनकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

शेतीमाल विक्रीसाठीही मदत

या स्पर्धेच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही फाउंडेशन कडून प्रयत्न सुरू आहेत यासाठी स्वतः अमीर खान प्रयत्न करत असून यासाठी मराठी सिनेजगतातील सिने कलाकारही सहभाग देणार आहेत.

२५ लाखांचे पहिले बक्षीस

या स्पर्धेमध्ये राज्यपातळीवर पहिला येणाऱ्या शेतकरी गटाला २५ लाख तर द्वितीय गटाला १५ लाख तर तृतीय गटाला १० लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याच बरोबर तालुका पातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकरी गटाला १ लाख रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com