कर्करोगानं मुलगी गेली, आई-वडिलांनी झाडारुपी जपल्या आठवणी

कर्करोगानं मुलगी गेली, आई-वडिलांनी झाडारुपी जपल्या आठवणी
Summary

याच झाडामध्ये सलोनीला पाहत त्यांची देखभाल करण्याचा निश्‍चयही त्यांनी केला.

करकंब (सोलापूर) : सतत चार वर्षे कर्करोगाशी जिद्दीने आणि हसत-खेळत लढत असतानाच करकंब (ता. पंढरपूर) येथील सलोनी रजपूत (Saloni rajput) हिने गतवर्षी 27 जून ह्या आपल्याच वाढदिवशी लावलेल्या झाडांचा पहिला वाढदिवस तिच्या आईवडिलांसह शिक्षकांनी साजरा केला. आणि याच झाडामध्ये सलोनीला पाहत त्यांची देखभाल करण्याचा निश्‍चयही त्यांनी केला.

कर्करोगानं मुलगी गेली, आई-वडिलांनी झाडारुपी जपल्या आठवणी
सोलापूर चारनंतर 'लॉक'! जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद?

अभ्यासात कायम नंबर एकवर असणाऱ्या सलोनी मोहनसिंह रजपूत हिला मार्च 2016 मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच कर्करोगाचे निदान झाले. पण त्याही परिस्थितीत न डगमगता तिने दहावीची परीक्षा दिली आणि तब्बल 93 टक्के गुण घेऊन करकंब विभागात पहिली आली. पुढे शस्त्रक्रिया झाल्यावरही औषधोपचारासाठी पुण्याच्या वाऱ्या करत तिने बारावी शास्त्र शाखेत 73 टक्के गुण मिळविले. दोघेही शिक्षक असणाऱ्या आई-वडिलांचा धीर खचत असतानाही त्यांना मेडिकल क्षेत्रातील प्रगतीचा हवाला देत आपणास काहीही होणार नाही, या आत्मविश्वासाने तिने कोर्टी येथे संगणक शास्त्र शाखेत प्रवेश घेतला.

कर्करोगानं मुलगी गेली, आई-वडिलांनी झाडारुपी जपल्या आठवणी
सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

गतवर्षी स्वतःच्या वाढदिवशी आपण शिक्षण घेतलेल्या न्यू इंग्लिश स्कुल प्रशालेत वृक्षारोपण करण्याचा मनोदय व्यक्त करत अनेक विविध प्रकारची झाडे लावली. पण त्यानंतर दोन महिन्यातच काळापुढे तिला हात टेकावे लागले. जंगजंग पछाडूनही तिच्या कुटुंबीयांसह तज्ञ डॉक्‍टरांनाही तिचा जीव वाचविता आला नाही. 27 जून या तिच्या जन्मदिनी तिच्या आठवणी जागविताना तिनेच गतवर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कर्करोगानं मुलगी गेली, आई-वडिलांनी झाडारुपी जपल्या आठवणी
सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

जिल्हा परिषद सदस्या रजनी देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, संस्थेचे अध्यक्ष वसंत बुगड, सचिव अविनाश देवकते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, स्कूल कमिटीचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे, मुख्याध्यापिका संगीता करमाळकर, पर्यवेक्षक दादासाहेब पिसाळ, वडील मोहनसिंह रजपूत, आई स्मिता रजपूत आणि सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत झाडांचा हा आगळावेगळा वाढदिवस साजरा झाला. यावेळी मान्यवरांनी इथून पुढे सलोनीला या झाडांच्याच रुपात पाहत त्यांची योग्य प्रकारे जोपासना करण्याचा संकल्प केला.

कर्करोगानं मुलगी गेली, आई-वडिलांनी झाडारुपी जपल्या आठवणी
औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको'

सलोनीच्या नावे शिष्यवृत्ती योजना

स्मिता रजपूत आणि मोहनसिंह रजपूत या सलोनीच्या आई-वडिलांनी सलोनीच्या नावे शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. त्यानुसार ते इयत्ता सहावीतील दोन गरीब व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांचा दहावीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च करणार आहेत. या मुली दहावी पास होऊन पुढे गेल्यावर पुन्हा सहावीतील दोन मुली पहिल्याप्रमाणेच दत्तक घेतल्या जातील. शिवाय दरवर्षी करकंबमधून दहावीच्या परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही सलोनीच्या नावे पारितोषिक देण्याची घोषणा त्यांनी केली. यासाठी आर्थिक तरतूद म्हणून शाळेच्या नावे बॅंकेत एक लाख रुपयांची कायम ठेव ठेवली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com