
-प्रमिला चोरगी
सोलापूर: पालकमंत्र्यांचा जिव्हाळ्याचा अन् अजेंडावरील वीस कोटींचा प्रकल्प केवळ जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रखडला आहे. जागा आहे पण जागेचा उताराच नसल्याने प्रस्तावित प्रकल्प रखडला आहे. उमेद मॉलसाठी प्रस्तावित जागेच्या निर्विवाद मालकीबाबत तत्काळ दोन दिवसात दाखला उपलब्ध करून देणेबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला पत्र दिले. या आदेशानंतर जागेच्या कागदपत्रांची शोध सुरू झाला असला तरी फाइल गायब झाल्याने जिल्हा प्रशासन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.