Solapur : अभियांत्रिकी प्रवेशाची आता शेवटची संधी

तिसऱ्या फेरीत नवीन विद्यार्थ्यांनाही मिळणार प्रवेश
Solapur NEWS
Solapur NEWSesakal

सोलापूर : अभियांत्रिकी पदवी प्रवेशाची दुसऱ्या फेरीची यादी आता जाहीर झाली आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच अलॉटमेंट मिळाले आहे, त्या सर्वांनी ऑनलाइन एक हजार रुपये भरून जागा फिक्स करून घ्यावी.

Solapur NEWS
Solapur : फेज-वन उड्डाणपूल मार्गातील ३१ मिळकतींचा होणार निवाडा : आयुक्त पी. शिवशंकर

आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तिसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे.ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमांकाचे ऑप्शन मिळाले, त्यांची जागा ऑटो फ्रिज होते आणि त्यांनी सीट ॲक्सेप्ट करून संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

Solapur NEWS
Solapur : कृषिमंत्र्यांना ओला दुष्काळ दिसेना; राजू शेट्टी

ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंती क्रमांकापासून पुढील महाविद्यालय अलॉट झाले आणि जर विद्यार्थी त्या महाविद्यालयास प्रवेश घेण्यास इच्छुक असतील, त्यांनी मिळालेली सीट ॲक्सेप्ट करावी. कोणाला अजूनही पसंती क्रमांकावरील महाविद्यालय किंवा शाखा हवी असल्यास त्यांनी ‘नॉट फ्रिज’ करून सीट ॲक्सेप्ट करावे आणि तिसऱ्या फेरीत सहभागी व्हावे.

Solapur NEWS
Solapur : दामाजी’ने एफआरपीचा शब्द पाळला : पाटील

विद्यार्थ्यांनी इतर कोणाशी पासवर्ड शेअर केला असल्यास तो तत्काळ बदलावा, जेणेकरून विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपल्या पसंतीच्या महाविद्यालय व शाखेत प्रवेश मिळालेला नाही, त्यांनी तिसऱ्या फेरीत पसंतीच्या महाविद्यालयात इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल ब्रँचसाठी प्रयत्न करावा. कारण, त्यातूनही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू शकतो.

Solapur NEWS
Solapur : रिक्षांवर उद्यापासून ‘आरटीओ’ची कारवाई

ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी अगेन्स्ट कॅपसाठी रजिस्ट्रेशन व कर्न्फमेशन करावे. जर प्रवेशासंदर्भात काही शंका असतील तर ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संपर्क करावा.

- डॉ. जे. बी. दफेदार, प्राचार्य, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर

Solapur NEWS
Solapur : जड वाहनांसाठी दिवसा शहराचा दरवाजा बंद

तिसऱ्या प्रवेश फेरीत ‘या’ बाबी लक्षात ठेवा

द्वितीय फेरीत मिळालेले महाविद्यालय अथवा शाखा पसंत नसल्यास तिसऱ्या फेरीत पुन्हा नव्याने ऑप्शन भरू शकतो. द्वितीय फेरीत मिळालेले महाविद्यालय हा तिसऱ्या फेरीमध्ये शेवटचा पसंती क्रम असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिसऱ्या फेरीत सर्व राहिलेल्या जागा खुल्या होतात. तिसऱ्या फेरीत जर विद्यार्थ्याला वरचा पसंती क्रम मिळाला, तर दुसऱ्या फेरीतील ऑप्शन रद्द होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तिसऱ्या फेरीत ऑप्शन टाकताना पूर्वीपेक्षा चांगला टाकावा. पहिल्या व दुसऱ्या फेरीत सहभागी न होऊ शकलेले विद्यार्थीसुद्धा तिसऱ्या फेरीत सहभागी होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com