

Solapur Deshmukh MLAs display unity while presenting development issues before CM Fadnavis.”
Sakal
सोलापूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेतली. सोलापूर शहरातील महत्त्वाच्या कामांची तपशीलवार माहिती दिली. सोलापुरातील दोन उड्डाणपूल, पाणी पुरवठ्याची योजना यासह इतर आवश्यक प्रकल्पासाठी निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.