Solapur : मोबाईल रिपेअरिंग ते पुरस्कार विजेता दिग्दर्शक

साडे येथील दिग्दर्शक मंगेश बदर यांचा प्रवास; मदार चित्रपटाला पाच पुरस्कार
director winning award
director winning award sakal

करमाळा : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये साडे (ता. करमाळा) येथील दिग्दर्शक मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केलेल्या मदार चित्रपटाला संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट या पुरस्कारासह पाच पुरस्कार मिळाले आहेत.

मंगेश बदल यांचा हा पहिला चित्रपट असून पहिल्याच चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहेत. मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय ते पुरस्कार विजेता दिग्दर्शक असा मंगेश यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

करमाळा येथे महाविद्यालय शिक्षण घेतल्यानंतर घरची परिस्थिती हालाखीची असल्याने करमाळा येथे बदर यांनी २०१० ते २०१३ असे तीन वर्ष मोबाईल रिपेअरिंगचे दुकान तीन वर्षे चालवले. मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवून ते घर खर्च भागवत होते. मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय ते दिग्दर्शक असा मंगेश बदल यांचा प्रवास राहिला आहे. हा प्रवास खरोखरच थक्का करणारा आहे.

साडे येथील शेतकरी कुटुंबातील मंगेश बदर यांचे आई -वडील साडे येथे पारंपारिक शेती करत असून त्यांचे शिक्षण येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झाले आहे. २०१० ते २०१३ या कालावधीत त्यांनी महात्मा गांधी विद्यालया जवळील नगरपालिकेच्या गाळ्यात मोबाईल रिपेरिंगचे दुकान चालवले आहे. त्यानंतर त्यांनी प्रा. प्रदीप मोहिते यांच्याशी चर्चा करून नगर येथे मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमसाठी ॲडमिशन घेतले.

मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम झाल्यानंतर आपण चित्रपट तयार करावा या दृष्टिकोनातून त्यांनी २०१८ ला कथा लिहिण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी २०१९ ला मदार या चित्रपटाचे चित्रीकरण करमाळा तालुक्यातील घोटी, वरकुटे, केम या भागात सुरू केले. मात्र पैशाची अडचण आल्याने हे चित्रीकरण थांबवण्यात आले.

घरची परिस्थिती हालाखीची असल्याने चित्रपट निर्मितीसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने चित्रपटाचे काम थांबले. नंतर त्यांना मिलिंद शिंदे यांनी चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक मदत केली.ग्रामीण जीवनाशी निगडित असलेली कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. मंगेश बदर यांनी दिग्दर्शित केलेल्या मदार या चित्रपटाला पुणे चित्रपट महोत्सवामध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

अमृता अग्रवाललाही उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मदर चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका केलेली अमृता अग्रवाल ही करमाळा येथील हॉटेल व्यवसायिक उमेश अग्रवाल यांची कन्या तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांची बहीण आहे. अमृता हिने प्रथमच चित्रपटात भूमिका केली असून तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मदर चित्रपटाला मिळालेले पाच पुरस्कार

संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट मराठी चित्रपट ः मदार

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट दिग्दर्शक ः मंगेश बदर

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेत्री ः अमृता अग्रवाल

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेता ः मिलिंद शिंदे

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बेस्ट सिनेमाटोग्राफर आकाश बनकर व अजय भालेराव.

चित्रपट काढायचा हे मी खूप मनावर घेतले होते. ग्रामीण जीवन प्रत्यक्ष अनुभवले असल्याने या चित्रपटात ग्रामीण भागात घडणाऱ्या घटना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मदर चित्रपटाला मिळालेले पुरस्कार माझा उत्साह वाढवणारे आहेत.

- मंगेश बदर, लेखक-दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com