esakal | मोहोळ : गावकरी अन्‌ शिक्षकांच्या समन्वयाचे आदर्श उदाहरण!
sakal

बोलून बातमी शोधा

mohol

मोहोळ : गावकरी अन्‌ शिक्षकांच्या समन्वयाचे आदर्श उदाहरण!

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : पापरी (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे गावकरी व शिक्षक यांच्या समन्वयाने रूपडे पालटले आहे. शाळेने लोकवर्गणीतून परिसरात तब्बल आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची माहिती मुख्याध्यापक श्री. खताळ यांनी दिली. गावकरी व शिक्षक यांच्यात समन्वय असल्यावर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पापरीची जिल्हा परिषद आदर्श शाळा.

पापरीची जिल्हा परिषद शाळा म्हणजे जिल्ह्यात आदर्श व वरच्या क्रमांकाची शाळा. शाळेने शिक्षकांच्या चिकाटीने प्रत्येक ठिकाणी आपला झेंडा रोवला आहे. त्यामुळे या शाळेचा जिल्ह्यात मोठा बोलबाला आहे. शाळेने एखादा उपक्रम राबविण्याचे ठरवले व त्याची माहिती गावकऱ्यांना दिली जाते. त्याच्या अंमलबजावणीला फारसा वेळ लागत नाही. शाळेने अनेक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, गुणवत्ता पूर्ण शाळा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंभू बचत गट शाळांना मोठी आर्थिक मदत करतात. त्यामुळे शिक्षकांचे मनोबल वाढण्यास मदत होते.

हेही वाचा: उद्योजक बनविणारा उद्योजक! प्रतिकूल परिस्थितीत उभारल्या पाच कंपन्या

पापरीची शाळा नेमके आहे, तरी कशी ती पाहण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर, डॉ. राजेंद्र भारूड, शिक्षण उपसंचालक श्री. पवार यांनी भेटी देऊन शाळेच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. केवळ शिक्षण हेच ध्येय न ठेवता शाळा सामाजिक उपक्रमातही अग्रेसर असते. आत्तापर्यंत रक्तदानाच्या माध्यमातून शाळेने दीडशे बाटल्या रक्तसंकलन केले आहे. शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख पाहून गावकऱ्यांसह प्रिसिजन उद्योग समूह, स्वयंभू बचत गट तसेच इतर सामाजिक संस्था यांनी मोठी मदत केली आहे. या शाळेने वॉटर बेल हा उपक्रम राबविला, पुढे तो संपूर्ण राज्यांने राबविला. शाळा परिसरात विविध फळाफुलांची दाट झाडे असल्याने या ठिकाणी ऑक्‍सिजन पार्क म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

हेही वाचा: श्रावण न पाळणारे खवय्ये खूश! भाजीपाल्याच्या दरात मिळताहेत मासे

दृष्टिक्षेपात पापरीची जिल्हा परिषद शाळा

विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा - जलशुद्धीकरण यंत्रणा - सुसज्ज ग्रंथालय - डिजिटल क्‍लासरूम व ई-लर्निंग प्रोजेक्‍टर टॅब - वॉटर बेल उपक्रम - व्हेजिटेबल बॅंक - हर्बल गार्डन - पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची सोय - शाळेत प्रोजेक्‍ट सोलर

हेही वाचा: बुद्धिजीवी राहिले दूर ! राजकीय अस्तित्वासाठी ओबीसी मेळावा

शाळेच्या यशाची परंपरा

  • शाळेला मिळालेले विविध पुरस्कार - 13

  • आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक - 25

  • शिष्यवृत्ती परीक्षेत निवड झालेले विद्यार्थी - 260

  • नवोदयसाठी निवड झालेले विद्यार्थी - 70

  • सातारा सैनिक स्कूलसाठी निवड झालेले विद्यार्थी - 10

loading image
go to top