मे महिन्यात महापालिकेची निवडणूक? महापौरांना कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी | Solapur Municipal Corporation Election Updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur Municipal Corporation Election Updates

नगरसेवक व प्रभागांची संख्या वाढल्याने पूर्ण जागांवर उमेदवार देऊ न शकलेल्या पक्षांची पंचाईत झाली आहे.

मे महिन्यात महापालिकेची निवडणूक?

सोलापूर : ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) लांबणीवर पडलेली महापालिका (Municipal Corporation), जिल्हा परिषदांची निवडणूक दहावी-बारावीची परीक्षा (Exam), रमजानपूर्वीचे रोजे आणि ओबीसी आरक्षण, या कारणांमुळे एप्रिलऐवजी मे महिन्यातच होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. (Solapur Municipal Corporation Election Updates)

हेही वाचा: सोलापूर : डिसले गुरुजी सेलिब्रिटी; अहवालानंतरच कारवाई

नवीन प्रभाग रचनेमुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 102 वरुन 113 होणार आहे. प्रभागांची संख्यादेखील वाढणार आहे. नगरसेवक व प्रभागांची संख्या वाढल्याने पूर्ण जागांवर उमेदवार देऊ न शकलेल्या पक्षांची पंचाईत झाली आहे. तरीही, प्रत्येकांनी सावध भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवल्याचे बोलले जात आहे. माजी महापौर नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी यांना त्यांच्या कार्यकाळात तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला होता. त्यानंतर विद्यमान महापौर श्रीकांचना यन्नम यांनाही तशीच लॉटरी लागणार आहे. 7 मार्च रोजी त्यांची मुदत संपणार आहे, तत्पूर्वी निवडणूक जाहीर होणे मुश्‍किल असल्याने त्यांनाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. भाजपच्या सत्ताकाळात त्यांच्याकडून झालेल्या चुका, कामकाजातील त्रुटी, लोकांची नाराजी दूर करण्याची संधी त्या निमित्ताने त्यांना मिळणार आहे. (Solapur Mahanagar Palika Election News)

निवडणुकीपूर्वी त्यांना महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळू शकते. निवडणूक लांबणीवर पडल्याचा सर्वाधिक फायदा महाविकास आघाडीला की सत्ताधारी भाजपला होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याचे पहायला मिळाले. सर्व कार्यकर्त्यांना त्या निमित्ताने उमेदवारी मिळाली आणि बंडखोरी झाली नाही. त्याच धर्तीवर आगामी महापालिका निवडणुकीत जागा वाटपांचा तिढा सहजासहजी सुटेल, अशी शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे भाजपला सत्ता मिळू नये, म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर, याचीही उत्सुकता आहे. त्यादृष्टीने अजूनपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.

हेही वाचा: सोलापूर : प्रास्तावित आहिल्यादेवी स्मारकाने शहीद किसन माने चौकाचे चित्र बदलणार

नवीन प्रभाग रचनेमुळे महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 102 वरुन 113 होणार आहे. प्रभागांची संख्यादेखील वाढणार आहे. नगरसेवक व प्रभागांची संख्या वाढल्याने पूर्ण जागांवर उमेदवार देऊ न शकलेल्या पक्षांची पंचाईत झाली आहे. तरीही, प्रत्येकांनी सावध भूमिका घेत स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवल्याचे बोलले जात आहे. माजी महापौर नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी यांना त्यांच्या कार्यकाळात तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला होता. त्यानंतर विद्यमान महापौर श्रीकांचना यन्नम यांनाही तशीच लॉटरी लागणार आहे. 7 मार्च रोजी त्यांची मुदत संपणार आहे, तत्पूर्वी निवडणूक जाहीर होणे मुश्‍किल असल्याने त्यांनाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता येणार आहे. भाजपच्या सत्ताकाळात त्यांच्याकडून झालेल्या चुका, कामकाजातील त्रुटी, लोकांची नाराजी दूर करण्याची संधी त्या निमित्ताने त्यांना मिळणार आहे.

निवडणुकीपूर्वी त्यांना महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळू शकते. निवडणूक लांबणीवर पडल्याचा सर्वाधिक फायदा महाविकास आघाडीला की सत्ताधारी भाजपला होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत बहुतेक ठिकाणी तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याचे पहायला मिळाले. सर्व कार्यकर्त्यांना त्या निमित्ताने उमेदवारी मिळाली आणि बंडखोरी झाली नाही. त्याच धर्तीवर आगामी महापालिका निवडणुकीत जागा वाटपांचा तिढा सहजासहजी सुटेल, अशी शक्‍यता कमीच आहे. त्यामुळे भाजपला सत्ता मिळू नये, म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार की स्वबळावर, याचीही उत्सुकता आहे. त्यादृष्टीने अजूनपर्यंत त्यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.

Web Title: Solapur Municipal Corporation Elections Will Be Held In May

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top