Solapur : आ.अवताडेची दोन वर्षे कही खुशी काही गम, मुख्य प्रश्न मंजुरीच्या प्रतीक्षेत

स्व. आ.भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत आ. समाधान आवताडे यांच्या गळ्यात आमदार पदाची माळ मतदारांनी टाकली परंतु ते आमदार झाल्यानंतर काही राजकीय विरोधकांनी भाजपाचे आमदार विरोधात आहेत
Solapur
Solapursakal

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - भाजप आ.समाधान आवताडे यांच्या आमदारकीला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत त्याच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अनेक रखडलेल्या प्रश्नाला कोट्यावधीचा निधी मिळाला असला तरी मतदारसंघातील मूळ प्रश्न मात्र मंजूरीसह निधीच्या प्रतीक्षेतच आहेत. रखडलेल्या प्रश्नाला न्याय मिळाल्यास आ.अवताडेचे राजकीय बस्थान आणखीन मजबूत होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

स्व. आ.भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत आ. समाधान आवताडे यांच्या गळ्यात आमदार पदाची माळ मतदारांनी टाकली परंतु ते आमदार झाल्यानंतर काही राजकीय विरोधकांनी भाजपाचे आमदार विरोधात आहेत त्यात आणखीन एक आमदाराची वाढ झाली अशा शब्दात खिल्ली उडवली.

होते परंतु विरोधी पक्षातला आमदार असल्यामुळे सुरुवातीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले परंतु ऐनवेळी राज्यात सत्ता बदलाचे नाट्य घडल्यानंतर समाधान आवताडे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार होताना डबल इंजिन सरकारमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये तालुक्यातील अनेक रखडलेल्या कामाला निधी मिळवला.त्यामध्ये रस्त्याच्या कामाला सर्वात जास्त कोट्यावधीचा निधी मिळाला.

Solapur
Mumbai Police : योगेंद्र आणि योगेश साटम यांच्या छायाचित्रांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

त्यांच्या आमदार निधीतून मतदारसंघात प्रलंबित विकासकामे मार्गी लागले आहेत याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारा निधी देखील तालुक्याला वाढला आहे.बंद असलेले भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू होण्याच्या प्रक्रियेत येऊन ठेपली. आरोग्य सेवेचा विचार करता निंबोणी येथील ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली.

जलजीवन योजनेतून अनेक गावातील पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला दहा कोटीचा निधी मिळाला. नगरपालिकेसाठी देखील शासनाच्या अनेक योजनेतून अनेक विकास कामे सुरू झाली.

गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला संत चोकोबा स्मारकाचा आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा सुधारित आराखडा शासनाला नुकताच सादर होण्याच्या मार्गावर आहे.

कृष्ण तलाव सुशोभिकरणासाठी पर्यटन खात्याकडून अडीच कोटींचा निधी मंजूर करून घेतला.ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून कोट्यावधीचा निधी मंजूर झाला. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील दोन विहिरीतील अंतराची अट कमी करण्यासाठी त्यांना यश आले पंढरपूर व मंगळवेढा येथे औद्योगिक वसाहत करण्यासाठी पहिल्याच प्रयत्नात यश आले सध्या महात्मा बसवेश्वर स्मारकाला नवीन समिती निश्चित झाली नसल्यामुळे याचे काम थांबले.

Solapur
Mumbai : जिल्हाधिकारी कार्यालयात रोज ‘लोक दरबार’ भरणार; पालकमंत्री लोढा

नगरपालिकेच्या विकास का रखडलेल्या प्रश्नावर बैठकी होऊन प्रशासनाला झापले अगदी तसाच प्रकार महावितरणच्या अधिकाऱ्याची बैठक घेऊन झापल्यामुळे महावितरणच्या 175 तक्राची दखल घेऊन अधिकारी कामाला लागले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार होऊन तालुक्याला कोट्यावधीचा निधी मिळाल्यामुळे आ. अवताडे यांच्या गळाला विरोधी गटातील अनेक जण लागले आहेत.भविष्यात त्यांच्या राजकीय बस्तानाची मोळी मजबूत होण्याचा मार्ग सुकर होत चालला आहे.

हे प्रश्न आहेत प्रलंबित

महात्मा बसवेश्वर स्मारक, संत चोखोबा स्मारक, मंगळवेढा उपसा सिंचन योजना, ग्रामीण रुग्णालयातील वाढीव बेड,गावनिहाय पर्जन्यमापक यंत्र, पंढरपूर विजयपूर रेल्वे मार्ग, मंगळवेढा आगारातून प्रवासाला सुखकर सेवा, लाच प्रकरणाने कलंकित झालेले महसूल खात्याच्या सुधारण्यात लक्ष घालण्याची, कृषी खात्याचा कृषी खात्याचा फळबाग योजनेचा लाभ सरसकट देण्याचे आवश्यकता,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com