Solapur : शेतकऱ्यांवर अन्याय नको; सरसकट पंचनामे करा : देशमुख

परतीच्या पावसाने उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Solapur farmer news
Solapur farmer newsesakal

सोलापूर : परतीच्या पावसाने उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यावर अन्याय करू नये, अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केल्या.

Solapur farmer news
Solapur : "दगड फोडणाऱ्या हातातून सुबक तुळशी वृंदावन निर्मिती

संपर्क कार्यालयात सोमवारी आमदार सुभाष देशमुख यांनी उत्तर आणि दक्षिण तालुक्यातील कृषी अधिकारी, तहसीलदार आणि तलाठ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन्ही तालुक्यातील पिकांच्या नुकसानभरपाईची माहिती घेतली. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी, तलाठी हे लवकर पंचनामा करत नाहीत, याबद्दल तक्रार केली. यावेळी अधिकाऱ्यांनी शासन निर्णयानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगत ऑक्टोबर महिन्याचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगितले.

Solapur farmer news
Solapur Farmer : मोहोळ तालुक्यातील 43 हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड.

यावेळी आमदार देशमुख यांनी ताबडतोब राज्याचे सचिव ढवळे यांना फोन करत ऑक्टोबर महिन्याचे पंचनामे करण्याचे आदेश परत लवकर काढावे, असे सांगितले. यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, उत्तर आणि दक्षिण तालुक्यात ६५ मिली पाऊस पडलेल्या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळणार आहे. ६५ मिलीपेक्षा कमी पाऊस पडलेल्या गावांची पाहणी करून त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com