Solapur : मातब्बर पुढाऱ्यांच्या कारखान्यांना नोटीस

जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यांच्या कारखान्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे
Solapur news
Solapur newsesakal

सोलापूर : जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यांच्या कारखान्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. उसाचा गाळप हंगाम सुरू करूनही त्याची माहिती साखर सहसंचालकांना न देणे कारखानदारांच्या अंगलट आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा यामध्ये आहे.

Solapur news
Travel Tips: बाईक रायडिंगचा भन्नाट अनुभव घ्यायचाय? पाहा भारतातील सर्वोत्तम पर्याय

ऊस गाळपाची सुरवात केल्यानंतर त्याबाबतची माहिती साखर सहसंचालकांना देणे कारखाना प्रशासनाला बंधनकारक असते. मात्र, जिल्ह्यातील सात कारखान्यांनी त्याबाबतची माहिती दिली नसल्याचे या नोटिशीवरून उघड होत आहे. वारंवार सूचना करूनही गाळप हंगाम सुरू झाल्याचे या कारखान्यांनी साखर सहसंचालकांना सांगितलेले नाही. त्यानंतर साखर सहसंचालक कार्यालयाकडून नोटीस पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

Solapur news
Parenting Tips: मुलांच्या रागावर असं मिळवा नियंत्रण, या आहेत सर्वात सोप्या टिप्स

या कारखान्यांचा समावेश

या सात कारखान्यांमध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील लोकमंगल, दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील लोकमंगल, लोकमंगल (माऊली), तसेच पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे, सांगोला तालुक्यातील सांगोला सहकारी साखर कारखाना, अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री लक्ष्मी आणि बार्शी तालुक्यातील इंद्रेश्वर कारखान्याचा यात समावेश आहे.

यंदा दर देणे कसे परवडते?

दरवर्षी उसाला २००० ते २२०० च्या पुढे भाव देणे परवडत नसल्याचे साखर कारखान्याकडून सांगण्यात येते. हीच गोष्ट कारखान्यांना यंदा अडचणीत आणणारी ठरणार आहे. कारण, याच साखर कारखान्यांमध्ये यावर्षी ऊसदर देण्याच्या आता स्पर्धा सुरू आहे. उसाच्या टंचाईमुळे यंदा ऊस मिळविण्यासाठी जास्तीत जास्त दर देण्याची स्पर्धा या साखर कारखान्यांमध्ये लागली आहे. मात्र, दरवर्षी २२०० च्या पुढे दर देणे परवडत नसल्याचे सांगणाऱ्या कारखान्यांना या वर्षी २८०० रुपये पहिला हप्ता देणे कसे परवडते, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com