Solapur: पंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियांचा हैदोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jcb.jpg
पंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियांचा हैदोस पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

पंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियांचा हैदोस

पंढरपूर : मागील काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्‍यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. भीमा नदीपात्रातून दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. वाढत्या वाळूचोरीमुळे भीमा नदीचे पात्र संकटात आले आहे. वाळू माफियांवरील पोलिस आणि महसूल प्रशासनाचा वचक कमी झाल्याने वाळूचोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. भीमा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक बंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, वाळू माफियांनी पुळूज बंधाऱ्याचे दरवाजे काढू पाणी सोडून दिल्याचा प्रकारही समोर आला आहे. बंधाऱ्यातील पाणी सोडून दिल्यामुळे नदीकाठच्या १४ गावातील शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

भीमानदी पात्रातील पाणी कमी झाल्याचा फायदा घेत वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सध्या पंढरपूर शहर व तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वाळूला मागणी वाढली आहे. रातोरात हजारो रुपये मिळवण्याच्या लालसेतून अवैध वाळू उपसा व वाहतूकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

अशातच अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधातील पोलिस आणि महसूल विभागाची कारवाई बोथट झाल्याने वाळू माफियांचे धाडस वाढले आहे. त्यामुळेच बिनदिकपणे दिवसाढवळ्या वाळूची चोरी केली जात आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला पोलिस आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचेच अभय असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
भीमा नदीकाठच्या शेळवे, कौठाळी, खेडभाळणी, इसबावी, शिरढोण, चिंचोलीभोसे, शेगाव दुमाला, गोपाळपूर, मुंडेवाडी, सरकोली, आंबे, चळे, पोहरगाव, पुळूज आदी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु आहे.

पोलिस आणि महसूल विभागाचे साफ दुर्लक्ष असल्यानेच वाळू उपसा सुरु असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांमधून केला जात आहे. वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी पुळूज (ता. पंढरपूर) येथील बंधाऱ्याचे दरवाजे काढून पाणी सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंधाऱ्यातून पाणी सोडून दिल्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असलेल्या जवळपास १४ गावांतील शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी तक्रार केली आहे.

हेही वाचा: SRH Player Retention : ऑरेंज आर्मीचा जम्मूच्या पोरांवर विश्वास

जिल्हा पथकाकडूनही कारवाईकडे दुर्लक्ष
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाकडून ही मागणील काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधातील कारवाई थंड झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या स्वतंत्र पथकाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक पोलिसांनी ही अवैध वाळू कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

Web Title: Solapur Pandharpur Illegal Sand Transport

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurSand Transport
go to top