क्रिकेटवर सट्टा लावणारे पोलिस कोठडीत! चौघांना अटक तर गोटू सिरशेट्टी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या चौघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे.

क्रिकेटवर सट्टा लावणारे पोलिस कोठडीत! चौघांना अटक

सोलापूर : जुळे सोलापुरातील प्रेम नगरात टी-20 विश्‍वचषकमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या चौघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. अमोघ साखरे, नागेश यळमेली, शिवराज हक्‍के व प्रभाकर उपासे यांना न्यायालयाने 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठवली आहे. तर या प्रकरणातील संशयित आरोपी गोटू सिरशेट्टी हा फरार झाला असून सट्ट्याचे कनेक्‍शन लातूरपर्यंत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

हेही वाचा: मांगल्य ज्वेलर्समध्ये आठ लाखांची चोरी

विश्‍वचषक सामन्याचा टॉस कोण जिंकणार, 6, 10, 15 व 20 षटकांमध्ये किती धाव होतील, शेवटी कोणता संघ सामना जिंकेल, यासाठी त्याठिकाणी सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात मोबाईल, लॅपटॉप, दुचाकी व हॉटबॉक्‍स, एक्‍टेशन बॉक्‍स, वायफाय डोंगल होता. सट्टा चालविणारे मालक व भागिदारांनी बक्षीसरुपी मिळणाऱ्या रकमेच्या अमिषातून लोकांची फसवणूक केली, असेही फिर्यादीत नमूद आहे.

हेही वाचा: सोलापूर : जुळे सोलापूरवर महापालिकेडून होतोय अन्याय

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप हे करीत आहेत. दरम्यान, फरार असलेल्या गोटूला पकडल्यानंतर सट्‌ट्‌टयाचा म्होरक्‍या कोण हे समोर येईल, असे पोलिस निरीक्षक जगताप यांनी सांगितले.

loading image
go to top