Maharashtra Rain Alert : सोलापूरकरांची चिंता वाढली! सलग 50 दिवसांच्या खंडानंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, मुंबई वेधशाळेकडून नवा इशारा

Solapur weather update : सोलापूर जिल्ह्यात दीड महिन्याहून अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. ५० हून अधिक मंडळांत २१ दिवस पाऊस झालेला नाही. सप्टेंबरमध्येही पावसाची तूट कायम आहे.
Solapur Weather Update

Solapur Weather Update

esakal

Updated on

सोलापूर : यंदा पावसाने सलग दीड महिन्यांहून अधिक काळ दडी मारल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला (Solapur Rain Forecast) आहे. मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मात्र, मागील १५ दिवसांत जिल्ह्यातील ९६ पैकी ५० हून अधिक मंडळांत पावसाने पाठ फिरवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com