Solapur : सोलापुरच्या अभियंत्याकडून स्कील शार्क व एक्स्प्लोरीकची निर्मिती,विदेशातील सहा विद्यापीठांनी घेतली दखल

देशभरातील विद्यार्थ्यांना रिन्युएबल एनर्जी, ई व्हेईकल, सोलार टेक्नॉलॉजी या पुढील काळात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केले. शैक्षणीक संस्था व तंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला.
solapur
solapursakal

सोलापूर - येथील फॉरेस्ट परिसरामधील २६ वर्षाच्या अशहर अहमद शेख या मेकॅट्रॉनिक्सच्या अभियंत्याने ‘स्कील शार्क व एक्‍स्प्लोरीका’ या दोन स्टार्टअपच्या माध्यमातून देशपातळीवर नाव कमावले आहे.

देश-विदेशातील कामांसोबत मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनल इनोव्हेशन सेल व एआयसीटीई (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन) या संस्थासोबत त्याचे स्टार्टअप जोडले गेले आहे.

अशहर अहमद शेखला सुरवातीपासून मेकॅट्रॉनिक्स व रोबोटीक्सची आवड होती. त्याच्या आई-वडिलांनी त्यांच्या आवडीला प्रोत्साहन देत गणित व अभियांत्रिकी शिक्षणाला प्रोत्साहन दिले. नंतर त्याने चेन्नई येथे मेकॅट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.

तेथेच त्यांनी अनेक रोबोट, इलेक्ट्रीक व्हेईकल, सोलार व्हेईकल असे रिन्युएबल एनर्जी, सोलार एनर्जी, ई व्हेईकलवर अनेक प्रोजेक्ट तयार करण्याचा धडाका लावला. त्यामुळे इनोव्हेशन क्षेत्रात काम करु शकतो हे त्याच्या लक्षात आले. त्याने एमबीएसाठी इनोव्हेशन व इंटरप्रीन्युअरशीप हा विषय निवडला.

तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा इंटरप्रीन्युअरशीपचे विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने स्कील शार्क या स्टार्टअपची सुरवात केली.

देशभरातील विद्यार्थ्यांना रिन्युएबल एनर्जी, ई व्हेईकल, सोलार टेक्नॉलॉजी या पुढील काळात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केले. शैक्षणीक संस्था व तंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्थांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला.

या स्टार्टअपचे काम करताना अशर शेख याने दहा हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील आयडीयाचे रूपांतर स्टार्टअपमध्ये करण्याच्या अडचणी दिसून आल्या. त्यातून एक्स्प्लोरीका स्टार्टअपची सुरवात अशहर शेख यांनी केली.

हे स्टार्टअप आता तरुणांच्या स्टार्टअप आयडीयावर इनक्युबेशन, फंडींग या सारख्या प्रक्रियांसाठी मदत करण्याचे काम एक्स्‍प्लोरीका स्टार्टअपच्या माध्यमातून केले जाते. केंद्राच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल व एआयसीटीई ने एक्स्प्लोरिकाशी जोडून घेत या स्टार्टअपची व्याप्ती वाढवली.

काही लक्ष्यवेधी नोंदी

  • आवडत्या विषयात करिअर व स्टार्टअप

  • आई व वडीलांचे प्रोत्साहन

  • दुबई येथे सर्वोत्कृष्ट स्टार्टअपचा पुरस्कार

  • ईव्ही इंजिनिअरिंग फंडामेंटल्स पुस्तकाचे लेखन

  • १० हजारापेक्षा अधिक तरुणांना प्रशिक्षण

solapur
Mumbai News : बदलापूर महामार्गावर एक मार्गिका बंद; वाहतूक कोंडीने चालक हैराण
  • मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन सेल व

  • एआयसीटीईचा एक्ल्प्लोरिकाला सहकार्य

  • मलेशियाच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्यक्रमात सहभाग

  • एकूण १० जणांना रोजगार

  • देशातील १०० शैक्षणीक संस्थांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

  • आफ्रिकेतील ४ विद्यापीठे, रशिया, स्वीडनमधील प्रत्येकी विद्यापीठात प्रशिक्षण

स्कील शार्क स्टार्टअप देशभरात तरुणांना रिन्युएबल एनर्जी, ई-व्हेईकल निर्मिती व तंत्रज्ञानावर मार्गदर्शन.

एक्ल्प्लोरीका स्टार्टअप- स्टार्टअप आयडीया असलेल्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप विकसनाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देणे.

माझ्या आईवडीलांनी मला सातत्याने आवड असलेल्या विषयात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच तरुणांशी संवाद साधत असताना त्यांच्या विकासासाठी नवे काही करण्याच्या उद्देशाने काम

करत राहिलो. जे काही करतोय त्यामध्ये मनापासून आनंद आहे. या क्षेत्रात अजून खूप काही करायचे आहे.

-अशहर अहमद शेख, संचालक, स्कील शार्क व एक्ल्पोरीका उद्योग, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com