esakal | माशाळे वस्ती, आरटीओ कार्यालयाजवळ मिळणार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

जास्तीत जास्त ग्राहक ऑनलाइन बुकिंग करत असल्याची माहिती आशिष माशाळे यांनी सांगितले.

माशाळे वस्ती, आरटीओ कार्यालयाजवळ मिळणार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील विजापूर रोड येथील माशाळे वस्ती आणि आरटीओ कार्यालय येथे पर्यावरणपूरक गणपती मूर्ती विक्रीचे स्टॉल आहेत. या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग असणे बंधनकारक असणार आहे. जास्तीत जास्त ग्राहक ऑनलाइन बुकिंग करत असल्याची माहिती आशिष माशाळे यांनी सांगितले.

हेही वाचा: अफगाणमधून विद्यार्थ्याने दिली सोलापूर विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा

येथील स्टॉलवर गणेशमूर्ती या 7 इंच ते 26 इंचपर्यंत आहेत. त्याचबरोबर कागदी लगदा आणि लालमाती मिक्‍स करून बनविण्यात आलेल्या गणेशमूर्ती देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल हा कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या सीमेवरून आणला आहे. लाल मातीद्वारे कोणतेही रसायन मिक्‍स न करता मूर्ती तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मूर्तीसोबत एक वृक्ष स्टॉलधारकांकडून ग्राहकांना भेट देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

माती लाल असल्याने मूर्तीला रंग देण्याची गरज नाही, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरणपूरक गणपतीची किंमत 200 रुपयांपासून ते 2 हजार 500 रुपयापर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. विजापूर रोड परिसरात आरटीओ कार्यालय, माशाळे वस्ती येथे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

हेही वाचा: पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची धडाकेबाज कारवाई!

कलावृंदावन चित्रशाळा इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा येथील गणपती अतिशय सुरेख असून ते नैसर्गिकरित्या वस्त्रगाळ लाल मातीतून तयार केलेले आहेत. तांबडी माती व नैसर्गिक रंग यांच्या मिलाफातून तयार झालेले मूर्ती अतिशय देखण्या आहेत. या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर ते 25 मिनिटांमध्ये विरघळून त्याच्यातून एक नवीन रोपटे तयार होते. सुबक चेहरा, बसण्याची ढब व सुंदर नयन हे गणपतीचे वैशिष्ट्य असले तरी ही पूर्ण मूर्ती पाहणाऱ्यांची मन मोहून घेते यात शंका नाही.

- दीपक पाटील, ग्राहक

काळाची गरज ओळखून केलेला अभिनव उपक्रम म्हणजेच लाल मातीपासून बनवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती. गेल्या चार वर्षांपासून आमच्या शिक्षण संकुलात या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. पर्यावरणाला हानी न पोहोचवता सण साजरा करणे अभिमानास्पद वाटते. असे अनुकरण प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने करावे.

- विमल सुतकर, ग्राहक

loading image
go to top