

Chimneys of Solapur sugar mills to start this Saturday; four defaulting factories also seek crushing permission.
Sakal
उ. सोलापूर : जिल्ह्यातील ऊस तोडणी हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. जिल्ह्यातील ४० पैकी ३३ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला असून, यामध्ये गेल्या हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे थकवलेल्या चार कारखान्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख हेक्टर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. पावसाळा लांबल्यामुळे गाळप हंगाम सुरू करणे हे सर्वांसाठीच कसरतीचे ठरणार आहे.