सोलापूरचे तापमान वाढले! दररोज अकराशे मेगावॉट वीजेचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

logo
सोलापूरचे तापमान वाढले! दररोज अकराशे मेगावॉट वीजेचा वापर

सोलापूरचे तापमान 42.1! दररोज अकराशे मेगावॉट वीजेचा वापर

सोलापूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात विजेची मागणीही वाढू लागली आहे. 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी साडेआठशे मेगावॉट वीज लागत होती. पण, सध्या विजेची मागणी अकराशे मेगावॉटवर पोचली आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक 42.1 अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा तडाखा वाढल्यास वीजेची मागणी आणखी वाढेल, असेही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: जिल्ह्यात पाच कारखान्यांसह सुतगिरण्यांचा वाजला बिगुल! मे महिन्यात निवडणूक

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तापमानाने उच्चांक गाठायला सुरवात केली आहे. उन्हापासून बचाव होण्यासाठी नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान मुले हे दुपारी नंतर घराबाहेर फिरणे टाळत आहेत. त्यामुळे घरात पंखा, कूलर, एसी, फ्रीज अशा इलेक्‍ट्रिक उपकरणांचा वापर वाढला आहे. बाजारातून अशा वस्तूंची विक्रीदेखील वाढू लागली आहे. स्वाभाविकपणे त्यामुळे विजेची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यासाठी दररोज 28 हजार मेगावॉट वीज लागत असून, मागच्या वर्षी याच दिवसांमध्ये 20 हजार 800 मेगावॉट वीज लागत होती. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात महावितरणचे एकूण पावणेअकरा लाख ग्राहक आहेत. त्यात तीन लाख 68 हजार कृषीपंपाचे ग्राहक आहेत. उन्हामुळे घरगुती ग्राहकांकडून विजेची मागणी वाढल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. मागील 15 दिवसांत तब्बल 250 मेगावॉटने विजेची मागणी वाढल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. दरम्यान, ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा: शाळांची वेळ पुन्हा बदलली! सकाळी 7 ते 12.30 पर्यंत भरणार शाळा

जिल्ह्यातील विजेचे ग्राहक
घरगुती ग्राहक
6,11,921
व्यावसायिक ग्राहक
61,075
औद्योगिक ग्राहक
18,032
शेतीचे ग्राहक
3,68,139

हेही वाचा: इंदापुरातील दोघांनी YouTube वर पाहिला व्हिडीओ! प्रभावित होऊन महिलांचं चेन स्नॅचिंग

दरमहा 250 कोटींची वीजबिले
घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक अशा सात लाख ग्राहकांना दरमहा 125 कोटींची बिले महावितरणकडून पाठविली जातात. तर दर तीन महिन्याला शेतीपंपाची बिले संबंधित शेतकरी ग्राहकांना पाठविली जातात. त्याची रक्‍कमही जवळपास 125 कोटी रुपयांपर्यंतच असते. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच विजेची मागणी वाढल्याने एप्रिल-मे महिन्यात जिल्ह्यासाठी दररोज किमान दीड हजार मेगावॉटपर्यंत वीज लागू शकते, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Solapur Temperature Rises Eleven Hundred Megawatts Of Electricity Consumption Per

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..