

Solapur University Building Inauguration Stuck Over Land Dispute
Sakal
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची हिरज रोडवर ४८२ एकर जमीन आहे. विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली असावे म्हणून त्या क्षेत्रात ५२ कोटींची भव्य प्रशासकीय इमारत बांधली. त्याच ठिकाणी १४ कोटींचा मल्टिपर्पज हॉल व १४ कोटी ८२ लाखांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारकही बांधले जात आहे. तिन्ही कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित आहे. मात्र, तिन्ही इमारती ‘वन’ आरक्षित जागेत येत असल्याने लोकार्पणाचा तिढा निर्माण झाला आहे.