

Solapur Zilla Parishad Election Results
Esakal
Solapur ZP Election 2026 : राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून सोलापूर जिल्हा परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल हाती आला असून माढ्यातील भोसरे गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आश्विनी दळवी यांनी दणदणीत विजय मिळवत खाते उघडले आहे. माढ्यात आतापर्यंत ३ उमेदवार विजयी झाले आहेत. पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवारांनी निवडणूक जिंकली आहे.