

New Political Battle in Solapur: Ex-MLAs’ Sons Step into ZP Arena
Sakal
सोलापूर: जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच नवीन चेहऱ्यांना सर्वच पक्षांकडून संधी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुका २०२२ मध्ये होणे अपेक्षित असताना चार वर्षांचे अंतर पडले आहे. यामुळे जे इच्छुक होते, त्यांचा पत्ता कट करून त्याठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संधी दिली आहे. यामध्ये विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भाऊ सागर कल्याशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मुलगा शिवराज म्हेत्रे तर तोळणूर गणातून मुलगी शीतल म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांचा मुलगा पृथ्वीराज माने, दीपक साळुंखे पाटील यांचा मुलगा सूर्यादित्य साळुंखे-पाटील निवडणूक रिंगणात आहेत.