सोलापूर : एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय

सोलापूर विभागात आत्तापर्यत 1 हजार 200 कर्मचारी कामावर रुजू झाले
ST
ST SAKAL

सोलापूर : सोलापूर विभागात आत्तापर्यत 1 हजार 200 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यात सर्वाधिक प्रशासनातील कर्मचारी असून, चालक-वाहकांची संख्या मात्र तोडकी आहे. मोजकेच चालक-वाहक कामावर येत असल्याने शहर आणि मोजक्‍याच तालुक्‍याच्या ठिकाणी लालपरीचे दर्शन होत आहे. त्यामुळे एसटीचे सकाळच्या सत्रातील वेळापत्रक सोडले तर दुपारी प्रवाशांना एसटीची प्रतिक्षाच करावी लागत असल्याचे पहायाल मिळत आहे. त्यामुळे दिवसभरासाठी निश्‍चित वेळापत्रकाची गरज असल्याचे प्रवाशांनी यावेळी सांगितले.

एसटी कर्मचा-यांचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील चार महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. जिल्हयातील सर्वच आगारांतील स्थानकांमध्ये मोठया प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, चालक-वाहकांच्या कमतरतेअभावी आगारांना लालपरी मार्गावर सोडण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यातूनही मार्ग काढून जिल्हयातील प्रवासी वाहतुकीला गती देण्यात येत आहे. मात्र, एसटीच्या वेळापत्रकाअभावी प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. पूर्वी प्रमाणे निश्‍चित वेळापत्रक नसल्याने प्रवाशांना आगारात सकाळपासून येण्याशिवाय पर्याय नाही. सकाळी काही गाडया वेळापत्रकानुसार धावत असल्या तरी दिवसभरासाठी वेळापत्रकाचे तीन-तेरा वाजत आहेत. अनेकदा प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी तासनतास लालपरीची वाट पाहावी लागत आहे. एखाद्या मार्गावर प्रवासी उपलब्ध झाल्यास तसेच चालक-वाहक असल्यास अशा मार्गावर बस सोडण्यात येते. अन्यिा या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे संपावर योग्य निर्णय त्वरीत व्हावा अशी मागणी देखील आता जोर धरु लागली आहे.

मागील चार महिन्यांपासून कर्मचा-यांचा संप सुरु असल्याने तारीख-पे-तारीख एवढीच प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय केंव्हा होणार याचीच प्रतिक्षा एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांना आणि कर्मचा-यांना लागून राहीली आहे. त्यामुळे संपामुळे एसटीने प्रवास करणा-या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे जोपर्यंत विलीनीकरण होणार तोपर्यंत कामावर येणार नाही अशी ठाम भूमिका कर्मचा-यांनी मांडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com