विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेण्याच्या ध्येयाने वाटचाल करावी : कुलगुरू डॉ. रामा शास्त्री 

siddh.jpg
siddh.jpg
Updated on

सोलापूर ः विद्यार्थिनींनी स्वतःचे शिक्षण मर्यादित न करता उच्चशिक्षणापर्यंत ते पूर्ण करून शिक्षणाचा पाया भक्कम करावा, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रामा शास्त्री यांनी व्यक्त केले. 

येथील श्री सिद्धेश्वर पॉलिटेक्‍निकच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त सिद्ध 2020 वार्षिक अंकाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामा शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री सिद्धरामेश्‍वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी होते. ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयामध्ये एमबीएचे शिक्षण सुरू झाले, ही स्वागतार्ह घटना आहे. विद्यार्थिनींनी त्यांचे शिक्षण पदवीकेपर्यंत न थांबवता पुढील उच्च शिक्षण घेतले पाहिजे. उच्च शिक्षणाच्या आधारे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. कुठल्याही कामाचा ताण न घेता आनंदाने काम करण्याची क्षमता विकसित करावी. खऱ्या अर्थाने मुलींच्या विकासासाठी हे महाविद्यालय मोठी कामगिरी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मैसूरचे इन्फोसिस कंपनीमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल कीर्ती कोसमी हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. आर. एस. पाटील, सीईओ शिवकुमार पाटील, सी. बी. नाडगौडा, पंच कमिटीचे ऑफिस सेक्रेटरी नीलकंठप्पा कोनापुरे, मल्लिकार्जुन कळके, गिरीश गोरनाळी, सुभाष मुनाळे, विश्‍वनाथ लब्बा, बसवराज अष्टंगी, भीमाशंकर पटणे उपस्थित होते. प्राचार्य गजानन धरणे यांनी स्वागत केले. 
सूत्रसंचालन श्रीशैल मळेवाडी यांनी केले. या वार्षिक अंकाचे संपादन प्रा. वृषाली मोटगी यांनी केले, आभार प्रा. वृषाली मोटगी यांनी मानले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com