Boragaon farmer files FIR after labor scam.
बार्शी : गजानन विजय पवार(रा.भडकुंबा,ता.मंगरूळपीर,जि.वाशीम) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे राजाभाऊ कांदे (वय ५२ रा.बोरगाव,ता.बार्शी) यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना २६ मार्च ते ३१ मे दरम्यान घडली. फिर्यादी कांदे शेतीबरोबरच बबनराव शिंदे शुगर लिमिटेड, तुर्कपिंपरी कारखान्यासाठी तीन वर्षांपासून ऊस वाहतूक ठेकेदारी करतात गजानन पवार मागील दहा वर्षांपासून बोरगाव(खुर्द)येथे ऊसतोड मुकादम म्हणून येत असे त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याची मागणी केली होती.