mla abhijit patil
sakal
पंढरपूर - ऊसाला पहिली उचल पाच हजार रुपये द्यावी या मागणीसाठी ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झाली असून, पंढरपूर तालुक्यातील दोन प्रमुख कारखान्यांचे गाळप बंद पाडण्यात आले आहे. कालपासून विठ्ठल सहकारी साखर कारखाना (वेणुनगर) आणि करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गव्हाण बंद आहे. दरम्यान आमदार अभिजीत पाटील हे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यावर गावगुंड घालून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी केला आहे.