Mohol News : दारूच्या नशेत एका ऊसतोड कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू

दारूच्या नशेत एका ऊसतोड कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सौंदणे, ता. मोहोळ येथे (ता. 11 मार्च) रोजी सायंकाळी 6 वाजता घडली.
Well
Wellesakal

मोहोळ - दारूच्या नशेत एका ऊसतोड कामगाराचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सौंदणे, ता. मोहोळ येथे (ता. 11 मार्च) रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. हुजूरसाब तुराबसाब शेख (वय-41) रा. महात्मा फुले नगर, भोकर, जिल्हा नांदेड असे मृत ऊसतोड कामगाराचे नाव आहे.

मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहिती नुसार, भोकर येथील ऊसतोड कामगारांची टोळी सध्या सौंदणे येथे ऊस तोडणी करीत आहे. ही टोळी मुकादम राजकुमार आडे यांच्या देखरेखीखाली कार्यरत आहे. सोमवारी दुपारी या टोळीतील हुजूरसाब शेख हा मजूर दारू पिऊन तो राहत असलेल्या झोपडीत येऊन झोपला.

दुपारी एक वाजता तो मी बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेला. सायंकाळचे सहा वाजले तरी तो परत आला नाही. त्यामुळे पत्नी शाहीन शेख व त्याच्या इतर मुलांनी शोध घेतला. परंतु हुजूरसाब मिळून आला नाही.

दरम्यान, मुकादम राजकुमार आडे याला सचिन प्रल्हाद जाधव याचा फोन आला की त्रिंबक तुळशीराम डोंगरे यांच्या शेतातील विहिरीत हुजूरसाब हा पडला आहे. तुम्ही लवकर या असे सांगितले. त्यावेळी पत्नी शाहीन व त्याच्या इतर मुलांनी जाऊन पाहिले असता हुजूरसाब हा विहिरीच्या तळाशी गेला होता.

गणेश जाधव व सचिन जाधव यांनी विहिरीत त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. ही घटना पोलिसांना कळविल्या नंतर पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण यांच्या पथकाने येऊन संबंधित विहिरीवरील मोटारीने पाणी उपसले व दुपारी दोन वाजता हुजूरसाब चा मृतदेह बाहेर काढला.

त्याला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची खबर शाहीन शेख यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com