Maratha Reservation: सर्कशीत आला अन्‌..गावाचा लाडका झाला; मराठा आरक्षणासाठी आत्महत्या; विलासची मन हेलावणारी कहाणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या विलास क्षीरसागर यांची कहाणी मोठी रंजक आणि तितकीच मन हेलावणारी आहे
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या विलास क्षीरसागर यांची कहाणी मोठी रंजक आणि तितकीच मन हेलावणारी आहे. लहानपणी सर्कशीत म्हणून आलेला विलास पुढे तारापूरकरांचा लाडका झाला. शेवटी त्याने गावासाठी आपल्या जीवाभावाच्या माणसांसाठी प्राण दिला.

मूळ गाव ओझेवाडी येथील असलेला विलास तारापूर येथील शेतकरी संतोष शेळके यांच्या शेतात छोटीमोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याला आई, वडील, सख्खा भाऊ असं कोणीच नसल्याने विश्वची माझे घर म्हणून तो तारापूर येथे गेल्या अठरा वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहात होता.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एका दिव्यांग तरुणाची आत्महत्या; घटनेने परिसरात खळबळ

अठरा वर्षा पूर्वी विलास एका सर्कशीत आला होता. गावात सर्कशीचे खेळ सुरू असताना त्याची गावातील लोकांशी नाळ जुळली. तेव्हापासून तो गावकऱ्यांचा लाडका झाला. येथील लोकांचा त्याला लळा लागल्याने तो गावातच राहत होता. आई, वडील, भाऊ असे कोणीच नसल्याने तो गावातील लोकांकडे छोटीमोठी कामे करत होता. येथील शेतकरी देखील त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत होते.

संतोष शेळके यांच्याकडे मागील काही वर्षापासून तो राहत होता. शळके यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून तो वावरत होता. गावातील लोकांचीही त्याला मायेची ऊब मिळाली होती. त्यामुळे तो आपली जातपात धर्म विसरून तो सगळ्या लोकांमध्ये मिळायचा. शिवाय तो गावकऱ्यांच्या सुख-दुःखत नेहमी पुढे असायचा.

Maratha Reservation
Maratha Reservation साठी कोकणातून पहिला राजीनामा; काँग्रेसच्या 'या' नेत्यानं पक्षाला दिली सोडचिठ्ठी

लहानाचा मोठा झालेला संतोष मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय झाला होता. सोमवारी तो येथील आंदोलनात सहभागी झाला होता. दोन दिवसांपासून तो आरक्षण मागणीसाठी अधिकच आक्रमक झाला होता. सरकार आरक्षण देण्यास उशीर करत असल्याने तो तणावात होता. आरक्षणासाठी मी बलिदान देणार, असे तो सगळ्यांना सांगत होता.

Maratha Reservation
Kunbi Caste Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया काय? 'असे' तपासा पुरावे...

येथील ग्रामस्थांनी त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न ही केला. पण शेवटी विलासने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचले. ही घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विलासचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. सगळ्यांवर प्रेम करणारा, तितकाच प्रत्येकाशी सौजन्याने वागणारा चालता बोलता हरहुन्नरी विलास आपल्यातून निघून गेल्याचे दुःख उराशी बाळगून जड अंतःकरणाने येथील ग्रामस्थांनी विलासला शेवटचा निरोप दिला.

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला! मात्र पुणे जिल्ह्यात आधीपासूनच 'कुणबी' प्रमाणपत्रांचे वाटप, आतापर्यंत...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com