
सोलापूर : ढोर समाज लोकशाही मानणारा आहे. आम्ही मूठभर असलो तरी सुशिक्षित आहोत. मागासवर्गीय गटात ढोर समाज संख्येने कमी असला तरी समाजाला आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून कक्कय्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.