Solapur:'काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गोंधळात सुशीलकुमार शिंदेंचा हस्तक्षेप'; आरोप-प्रत्यारोप बंद करण्याची सूचना
काँग्रेस भवनामध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उत्तर सोलापूर तालुक्यातील चैतन्य घोडके यांनी पदाधिकारी निवडीबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याची तक्रार केले. तसेच ताईंना पदाधिकारी निवडीचे अधिकार नसल्याचे म्हटले.
सोलापूर : शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अखेर आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत घालून विषय बंद करण्याची तंबी दिली.