esakal | तेरा महिन्यांतच चारित्र्यावर संशय! पती व सासूने केला लाथ मारून गर्भपात
sakal

बोलून बातमी शोधा

तेरा महिन्यांतच चारित्र्यावर संशय! पती व सासूने केला लाथ मारून गर्भपात

भावाच्या पत्नीला अश्‍लील भाषेत बोलून तिच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याबद्दल पीडित महिलेने विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली.

तेरा महिन्यांतच चारित्र्यावर संशय! पती व सासूने केला लाथ मारून गर्भपात

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भावाच्या पत्नीला अश्‍लील भाषेत बोलून तिच्या मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याबद्दल पीडित महिलेने विजापूर नाका पोलिसांत (Vijapur Naka Police) फिर्याद दिली. ही घटना पीडित महिलेच्या सासरी घडली असून, तिच्या फिर्यादीवरून दीर व पतीसह सासरकडील पाच जणांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

हेही वाचा: पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना !

माझ्या चारित्र्याचा संशय घेऊन दिराने मला मानसिक व शारीरिक त्रास दिला. त्याने व्यवसायासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून छळ केला. पीडित महिला गरोदर असतानाही पती व सासू या दोघांनी शिवीगाळ सुरूच ठेवली. त्यानंतर त्यांनी रागाच्या भरात गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सासरकडील मंडळी तेवढ्यावरच थांबली नाहीत; त्यांनी तुझ्या पोटातील मूल जन्माला येऊ देणार नाही म्हणून पोटात जोरात लाथ घातली. त्यामुळे माझा गर्भपात झाला, असेही फिर्यादीत नमूद आहे. दिराने चारित्र्यावर संशय घेऊन अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली आणि मनास लज्जा वाटेल असे कृत्यही केले, असेही पीडितेने पोलिसांना सांगितले. 498 कलमाअंतर्गत दिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ हे करीत आहेत.

हेही वाचा: 'भाजयुमो'च्या जिल्हाध्यक्षासह चौघे तडिपार!

13 महिन्यांतच संसाराची काडीमोड

सोलापुरातील एका तरुणीचा विवाह मुंबईतील एका मुलाशी ठरला. 20 जुलै 2020 मध्ये त्यांचा विवाह पार पडला. विवाहानंतर काही दिवस दोघांचा संसार सुखाने सुरू होता. मात्र, काही महिन्यांनी त्यांच्यात भांडणं व्हायला लागली. दिराने वहिनीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ सुरू केली आणि त्याच्यासोबतच पती व सासूनेही शिवीगाळ, मारहाण सुरू केली. सासरकडील मंडळी एवढ्यावरच थांबली नाहीत, त्यांनी चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटावर लाथ मारली आणि त्या वेळी गर्भपात झाला. या भांडणामुळे विवाहानंतर 13 महिन्यांतच त्या दोघांचा संसार पोलिस ठाण्यापर्यंत पोचला. आता फिर्यादीनुसार घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी होईल, असे तपास अधिकारी कोल्हाळ यांनी सांगितले.

loading image
go to top