लसीचे डोस झाले असेल तर बोला! तहसीलदार रावडे यांचा सूचक इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tehsildar swapnil rawade

तालुक्यात 45 हजार 166 नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.

लसीचे डोस झाले असेल तर बोला! तहसीलदार रावडे यांचा सूचक इशारा

मंगळवेढा (सोलापूर) : ओमिक्रॉन (Omicron) रोगाच्या साथीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात 45 हजार 166 नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. लसीकरण (Vaccination) मोहीम तीव्र केली असून तहसीलदार स्वप्निल रावडे (Tehsildar Swapnil Rawade) यांनी लसीचे डोस झाले असेल तर बोला, असा सूचक इशारा दिल्यामुळे लसीकरणाला गती येणार आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री पावले अन् मंगळवेढा नगरपालिकेला 5 कोटी दिले

तालुक्यातील बहुतांश लोकांची कामे तहसील कार्यालयाशी निगडीत अधिक असल्यामुळे या कामासाठी लसीकरणाचा इशारा दिल्यामुळे आता लसीकरण (Vaccination) करून घ्यावे लागणार आहे. शहरासह ग्रामीण भागाची लोकसंख्या 2 लाख 24 हजार 557 इतकी असून 18 वर्षा वरील लोकसंख्या 1 लाख 65 हजार 4 इतकी असून 1लाख 19 हजार लोकांनी पहिला डोस घेतला आहे. अदयापही पहिल्या डोसविना 45 हजार 166 नागरिक राहिले आहेत. दुसरा डोस 48 हजार 304 लोकांनी घेतला आहे. तर 1 लाख 16 हजार 700 दुसर्‍या डोसविना नागरिक राहिले आहेत. पहिल्या डोसचे काम 73 टक्के पुर्ण तर दुसर्‍या डोसचे काम 30 टक्के झाले. मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय- 99, आंधळगांव- 73, भोसे-69, बोराळे -65, मरवडे -60, सलगर बु.-68 लसीकरण झाले. परदेशातून मंगळवेढा शहरात-1, खवे -1, कचरेवाडी -1 असे 3 नागरिक आले असल्याचे आरोग्य विभागाकडून (Department of Health) सांगण्यात आले.

हेही वाचा: मंगळवेढा नगरपालिकेसाठी आवताडेंची स्वतंत्र मोर्चेबांधणी

लसीकरण कमी झालेल्या तालुक्यातील 11 गावांसाठी 11 पालक अधिकाऱ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली असून दिवसरात्र लसीचे कॅम्प (Vaccine Camp)
आयोजित करून लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कमी लसीकरण झाले आहे म्हणून या गावाचे लसीकरण उद्दिष्ट वाढण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. यामध्ये नियुक्त अधिकारी, गावाचे नाव पंढरीनाथ भोसले (कार्यकारी अभियंता, सोलापूर) मंगळवेढा शहर, सुप्रिया चव्हाण (गट विकास अधिकारी,मंगळवेढा) तळसंगी, पोपट लवटे (गटशिक्षणाधिकारी मंगळवेढा) खोमनाळ, सौरभ शेटे पोलीस उपनिरीक्षक हुलजंती, सत्यजित आवटी (सपोनि मंगळवेढा) हुन्नूर, अमोल बामणे (स.पो.निरीक्षक) गोणेवाडी, सोनम जगताप (पोलिस उपनिरीक्षक सांगोला) दामाजी नगर, अंकुश माने (स.पो.नि. कामती) नंदेश्वर, आशतोष चव्हाण (पो. नि.मोहोळ) शिरनांदगी, नितीन थिटे (स.पो. नि.मुंद्रुप) नंदूर, प्रवीण संपागे (स.पो.नि.सोलापूर) मानेवाडी या गावासाठी नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Tehsildar Swapnil Rawade Has Warned To Speak If There Is A Dose Of Vaccine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SolapurDose
go to top