esakal | जन्म-मृत्यूचा दाखला मिळेना! जीवन विमा अन्‌ मुलांचा खोळंबला प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

जन्म-मृत्यूचा दाखला मिळेना! जीवन विमा अन्‌ मुलांचा खोळंबला प्रवेश

काही महिन्यांपूर्वी जन्म-मृत्यूचे दाखले ऑनलाइन देण्याची पध्दत सुरू झाली. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन, कामकाजात सुसूत्रता नाही, अनुभवी मनुष्यबळ नाही, अशा विविध अडचणींमुळे हा विभाग सातत्याने डोकेदुखी ठरला आहे.

जन्म-मृत्यूचा दाखला मिळेना! जीवन विमा अन्‌ मुलांचा खोळंबला प्रवेश

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जन्म-मृत्यू दाखल्यासाठी (birth and death certificates)गर्दी होत असल्याने हा विभाग महापालिकेतून हुतात्मा स्मृती मंदिराशेजारी हलविण्यात आला. मात्र, त्याठिकाणीही जागा अपुरी पडत असून संगणक ठेवायला जागाच नाही. तर अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्यात आल्याने कामकाजात सुसूत्रता नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे नागरिकांनाही त्याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यामुळे आता हा विभाग डफरीन चौकातील महापालिकेच्या हॉस्पिटलमधील (Dufferin Hospital) मेडिकल स्टोअरच्या जागेत हलविण्यात येणार आहे.(The department has been set up near Dufferin Hospital in Solapur as there is a rush for birth and death certificates.)

हेही वाचा: शिक्षकांच्या पगारी 'या' कारणामुळे लांबणीवर! 1 तारखेला वेतन नाहीच

कोरोनामुळे शहरातील एक हजार 409 तर ग्रामीणमधील काही रुग्णांचा शहरात मृत्यू झाला. त्यांच्यावरही महापालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे शहरात दरमहा अंदाजित दीड हजारांहून अधिक प्रसुती होतात. त्यामध्ये शहराबरोबरच ग्रामीण भागातील मातांचाही समावेश असतो. खासगी दवाखान्यांच्या माध्यमातून त्याची नोंद महापालिकेत केली जाते. काही महिन्यांपूर्वी जन्म-मृत्यूचे दाखले ऑनलाइन देण्याची पध्दत सुरू झाली. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊन, कामकाजात सुसूत्रता नाही, अनुभवी मनुष्यबळ नाही, अशा विविध अडचणींमुळे हा विभाग सातत्याने डोकेदुखी ठरला आहे.

हेही वाचा: कोव्हॅक्‍सिन की कोव्हिशील्ड; गर्भवती महिलेने कोणती लस घ्यावी?

कोरोना काळात महापालिकेत दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने ते दाखले झोन कार्यालयात देण्याचा निर्णय झाला. मात्र, घोषणा होऊन काम होत नाही, तर त्यासाठी तशी व्यवस्था त्याठिकाणी असायला हवी. त्यामुळे पुन्हा हुतात्मा स्मृती मंदिरालगतची जागा या विभागाला देण्यात आली. त्याठिकाणी जागा खूपच अपुरी असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांची पंचाईत होऊ लागली आहे. असे असतानाही त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून पालकांना उध्दट उत्तरे दिली जात असल्याचीही स्थिती आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 199 शाळा मुख्याध्यापकांविनाच !

दाखल्यांअभावी शाळा प्रवेशाला अडचणी

कोरोना काळात सुरवातीला मयत झालेल्या व्यक्‍तींचे अजूनही मृत्यू दाखले मिळालेले नाहीत. दुसरीकडे ऑनलाइन लिंक ओपन करताना तांत्रिक अडचणी येत असतानाही कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय दाखला मिळणार नाही, अशी ताठर भूमिका या विभागाने घेतली आहे. दुसरीकडे मुलाचा जन्म झाल्यानंतर सुरवातीला दवाखान्यातील पावतीवर संबंधित प्रसुत महिला, तिच्या पतीसह संपूर्ण माहिती, त्यांचा आधार क्रमांक लिहून दिल्यानंतर दाखला मिळत होता. मात्र, ऑनलाईनच्या प्रयत्नात आता प्रत्येक कागद ऑनलाइन अपलोड करावा लागत असल्याने हॉस्पिटलचे कर्मचारीही वैतागले आहेत. दाखले वेळेत न मिळाल्याने मुलांच्या शाळा प्रवेशाची चिंता पालकांना लागली आहे. तरीही, महापालिकेकडून काहीच निर्णय होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली !

नागरिकांसह नगरसेवकांनी जन्म-मृत्यू दाखल्यांसंदर्भात अडचणीत आहेत. त्या सोडविण्याच्या निमित्ताने आता हा विभाग डफरीन हॉस्पिटल परिसरात आणला जाणार आहे. त्यानंतर निश्‍चितपणे अडचणी सुटतील, असा विश्‍वास आहे.

- धनराज पांडे, उपायुक्‍त, सोलापूर महापालिका

loading image