esakal | ऍक्‍टिव्ह रुग्णांमुळे वाढला "आरोग्या'वरील ताण ! आज 2222 रुग्णांची वाढ; 42 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona

ऍक्‍टिव्ह रुग्णांमुळे वाढला "आरोग्या'वरील ताण ! आज 2222 रुग्णांची वाढ; 42 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ऍक्‍टिव्ह 15 हजार 572 रुग्णांपैकी सुमारे साडेतीन हजारांवर रुग्णांना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची गरज असून, रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचीही मागणी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून उपचार वेळेत न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. आज दोन हजार 222 रुग्णांची वाढ झाली असून शहर व ग्रामीणमध्ये प्रत्येकी 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहर-जिल्ह्यात दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण वाढत असून सध्या शहरातील दोन हजार 804 तर ग्रामीणमधील 12 हजार 768 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अकरा हजारांपर्यंत रुग्ण कोव्हिड केअर सेंटरच्या माध्यमातून उपचार घेत आहेत. शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याचा दिलासा मिळाला, परंतु 21 जणांचा मृत्यू झाल्याची चिंता कायम आहे.

हेही वाचा: लसीकरण केंद्रावर नको गर्दी ! घरी बसूनच करा "अशी' ऑनलाइन नोंदणी

आज शहरातील प्रभाग क्रमांक 14, 17 आणि 19 मध्ये एकही रुग्ण आढळला नाही. तर सर्वाधिक 40 रुग्ण 24 नंबर प्रभागात आढळले आहेत. शहरात आज 181 रुग्ण आढळले असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील 11 तर अश्‍विनी रुग्णालयातील दोन, बॉईज, नवनीत, धनराज गिरजी, कादरी, बदलवा, श्री मार्कंडेय, सीएनएस व गंगामाई या रुग्णालयातील प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागातील अक्‍कलकोट तालुक्‍यात 84, सांगोल्यात 153, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 46 रुग्ण सापडले असून त्या ठिकाणी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर पंढरपूर तालुक्‍यात 462 रुग्ण सापडले असून पाचजणांचा तर करमाळ्यात 165 रुग्ण वाढले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्‍यातही 255 रुग्ण वाढले असून चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यात 54 रुग्ण वाढले असून तिघांचा, मोहोळ तालुक्‍यात 195 रुग्ण वाढले असून दोघांचा, बार्शीत 231, मंगळवेढ्यात 159, माढ्यात 237 रुग्ण वाढले असून या तिन्ही तालुक्‍यांतील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनाचा बळी ठरला आहे.

हेही वाचा: लसीसाठी सोलापूर वेटिंगवरच ! लसीअभावी 339 केंद्रे बंद

मृतांमध्ये दहाजणांचे वय 50 पेक्षा कमी

शहर-जिल्ह्यात आज 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पंढरपुरातील नागपूरकर मठ येथील 45 वर्षीय तर लाड नगरातील 42 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच रावगाव (ता. करमाळा) येथील 35 वर्षीय तर अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) 35 आणि नातेपुते (ता. माळशिरस) येथील 25 वर्षीय पुरुष कोरोनाचा बळी ठरला आहे. तर शहरातील बुधवार पेठ (निला नगर) येथील 45 वर्षीय आणि वसंत विहार (पोलिस लाइन) येथील 48 वर्षीय पुरुषाचा, मोदीखाना येथील 45 वर्षीय पुरुष, काडादी गल्लीतील 42 वर्षीय पुरुषाचा तर आदित्य नगर (विजयपूर रोड) येथील 40 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.