esakal | Solapur : विद्यापीठाच्या पीएचडी जागांमध्ये वाढ! सर्वच उमेदवारांच्या होणार मुलाखती
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur University

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात "पीएचडी' प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विद्यापीठाच्या पीएचडी जागांमध्ये वाढ! सर्वांच्या होणार मुलाखती

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) 'पीएचडी' (Ph.D.) प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तत्पूर्वी, 644 जागांसाठी जवळपास अडीच हजार उमेदवारांनी 'पेट-8' दिली. दरम्यान, विविध विषयांमधील जागांची वाढ करण्यात आली असून, आता 790 जागांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

हेही वाचा: दीड लाख मुले घेताहेत ऑफलाइन शिक्षण! नियम पाळून 750 शाळा सुरू

विद्यापीठातील पीएचडीसाठी राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद या विद्यापीठांतील उमेदवारांनीदेखील अर्ज केले होते. त्यात सर्वाधिक प्राध्यापकांचाच समावेश आहे. अडीच हजार उमेदवारांची जनरल मेरिट यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता विषयनिहाय व आरक्षणनिहाय यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. एका जागेसाठी तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. 790 जागांसाठी अडीच हजारांपर्यंत उमेदवार असल्याने त्या सर्वांच्याच मुलाखती घेतल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यातही विषयांच्या जागा अन्‌ उमेदवार पाहून त्यातील प्रत्येक जागेसाठी तिघांच्या मुलाखती होतील. तत्पूर्वी, स्थानिक विद्यापीठ व अन्य विद्यापीठातील उमेदवारांची यादी वेगळी केली जाणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उमेदवाराने अन्य विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असल्यास त्यांनाही स्थानिक म्हणून संधी दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा विद्यापीठाकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्या सर्व मुद्‌द्‌यांवर आता काम सुरू असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

"पेट'नंतर जनरल मेरिट यादी प्रसिद्ध झाली असून, आता विषय व आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी जाहीर होईल. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबविली जात असून, पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.

- डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्र-कुलगुरू

हेही वाचा: ONGC मध्ये निघाली ग्रॅज्युएट ट्रेनी भरती! 1 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

विलंबामुळे वैतागले भावी डॉक्‍टर्स

ऑगस्टमध्ये "पेट' झाली, तरीही अजून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झालेली नाही. मराठी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत तांत्रिक चुका असल्याने ती परीक्षा पुन्हा घ्यावी लागली. त्यानंतर सर्वच विषयांची जनरल मेरिट यादी प्रसिद्ध करण्यात आली. ती यादी प्रसिद्ध होऊनही बरेच दिवस झाले, मात्र अजूनपर्यंत पुढील प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे उमेदवार वैतागले आहेत. दरम्यान, आता ऑक्‍टोबरअखेर प्रवेशापूर्वीचे टप्पे पूर्ण करून प्रवेशाला सुरवात होईल, असे विद्यापीठातील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top