शेतकरीपुत्राची 'IPS'ला गवसणी! सलग तीन वर्षे 'UPSC'मध्ये यश

शेतकरीपुत्राची 'आयपीएस'ला गवसणी! सलग तीन वर्षे 'यूपीएससी'मध्ये यश
शेतकरीपुत्राची 'आयपीएस'ला गवसणी! सलग तीन वर्षे 'यूपीएससी'मध्ये यश
शेतकरीपुत्राची 'आयपीएस'ला गवसणी! सलग तीन वर्षे 'यूपीएससी'मध्ये यशCanva
Summary

2019 मध्ये 'आयपीएस' पदाला गवसणी घातलेले कासेगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुख यांची यशोगाथा स्पर्धा परीक्षार्थींसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

सोलापूर : स्पर्धा परीक्षा (Competitive examination) करणे हे ध्येय नव्हते पण मनातून करावेसे वाटत असल्याने अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच नोकरीचा राजीनामा दिला आणि यूपीएससीची (UPSC) वाट धरली. कोणत्याही प्रकारचे क्‍लासेस न लावता वेळेचे योग्य नियोजन करून जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर 'यूपीएससी'तून सलग तीन वर्षे वेगवेगळ्या पदांवर यश संपादन केले. 2019 मध्ये 'आयपीएस' (IPS) पदाला गवसणी घातलेले कासेगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह बाळासाहेब देशमुख (Abhaysinh Deshmukh) यांची ही यशोगाथा (Success Story) स्पर्धा परीक्षार्थींसाठी निश्‍चितच प्रेरणादायी आहे.

आपल्या यशाबाबत अभयसिंह देशमुख सांगतात, की वडिलांचे एमबीए शिक्षण झाले होते. परंतु आजोबांच्या इच्छेखातर शेतजमीन चांगली असल्याने, नोकरी न करता ते शेतीत रमले. दरवर्षी शेतीत विविध प्रयोग करून उत्पन्न घेतात. माझ्या शिक्षणाच्या निमित्ताने कासेगावहून पंढरपूर येथे स्थायिक झालो. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्लिश मीडियम स्कूल तर उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथून झाले.

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून त्यांनी सिव्हिल शाखेतून डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंग करत असताना स्पर्धा परीक्षांबद्दल मनात सतत विचार घोळत असायचे. परंतु एकाचवेळी इंजिनिअरिंग व स्पर्धा परीक्षा करणे शक्‍य नव्हते. इतर मुलांप्रमाणे माझेही त्यावेळी तर इंजिनिअरिंग चांगल्यारीतीने पूर्ण करून, एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करणे हेच उद्दिष्ट होते. तसे घडत देखील होते.

शेतकरीपुत्राची 'आयपीएस'ला गवसणी! सलग तीन वर्षे 'यूपीएससी'मध्ये यश
कोरोनामुळे वडिलाचं छत्र हरपलं; तरी मुलीनं त्यांचं स्वप्न साकारलं

शालेय जीवनापासून गुणवत्तेत अव्वल असल्याने, हे स्थान कायम राखले होते. त्यामुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होताच कॉलेज कॅम्पसमधून मुंबई येथे लार्सन अँड टब्रो (L & T) या कंपनीमध्ये नोकरी लागली. अपेक्षित असलेले लक्ष्य पूर्ण झाले होते. नोकरीसाठी हजर झालो, परंतु इतर मित्र पुण्यात स्पर्धा परीक्षा करत होते. त्यांच्या संपर्कात असल्याने, पुन्हा यूपीएससी करण्याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला. यामुळे वर्षभराच्या आतच नोकरीचा राजीनामा देत पुणे गाठले. ऐनवेळी घेतलेला निर्णय सार्थकी लावायचा होता. स्वतःवर विश्वास होता. कोणत्याही प्रकारचे क्‍लासेस न लावता फक्त टेस्ट सिरीज देत राहिलो. या काळात अविनाश गोखले यांचे चांगले सहकार्य लाभले.

शेतकरीपुत्राची 'आयपीएस'ला गवसणी! सलग तीन वर्षे 'यूपीएससी'मध्ये यश
Solapur : विकासाच्या वाटा मृगजळच ठरणार का?

पहिल्या प्रयत्नात 2017 साली "यूपीएससी'त 503 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. "आयसीएलएस'मध्ये नोकरी लागल्याने ती स्वीकारली. परंतु प्रयत्न मात्र सुरू होते. नंतर 2018 च्या निकालात 361 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. या वेळी "आयआरटीएस' म्हणून निवड झाली; परंतु अपेक्षित ध्येय मिळाले नव्हते. अभ्यासात सातत्य होतेच अन्‌ पाठीमागील परीक्षांचा अनुभव व मित्रांचा अभ्यास करण्यासाठी असलेला ग्रुप, आई-वडिलांचा असलेला पाठिंबा यामुळे 2019 च्या घेण्यात आलेल्या "यूपीएससी'च्या परीक्षेत 151 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत "आयपीएस' पद संपादन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com