ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरीचे कार्तिकी यात्रेतील उत्पन्न 'लॉक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Workers

आगामी काळात एसटी प्रशासनाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

ST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरीचे कार्तिकी यात्रेतील उत्पन्न 'लॉक'

सोलापूर : दरवर्षी पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडते. मात्र कोरोनानंतर आत्तातरी कुठे लालपरी पूर्ववत होत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागील सात दिवसांपासून लालपरीची चाके जागेवर थांबून आहेत. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला कार्तिकी यात्रेच्या हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात एसटी प्रशासनाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

हेही वाचा: कार्तिकी वारी : दर्शनरांगेतील दाम्पत्याला यंदा महापूजेची संधी

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्‍य असलेल्या एसटीची चाके गेल्या सात दिवसांपासून थांबली आहेत. मागील दीड वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरीच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे आषाढी यात्रेवर निर्बंध असल्याने आषाढी वारी होऊ शकली नाही. मात्र यंदाच्या वर्षी कार्तिकी यात्रेला प्रशासनाने परवानगी दिली. मात्र एसटी महामंडळाकडून कार्तिकी यात्रेनिमित्त गाड्यांचे नियोजन देखील करण्यात आले होते.

हेही वाचा: एसटी संपाचा 'कार्तिकी'वर परिणाम! उलाढाल ठप्प; खासगी वाहने, रेल्वेचाच आधार

सोलापूर विभागांतून जवळपास 154 गाडयांचे कार्तिकी यात्रेनिमित्त नियोजन करण्यात आले होते. यातून महामंडळाला 1 कोटी 27 लाखांचे उत्तन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गाड्या जागेवरच थांबून असल्याने उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. दरम्यान मागील सात दिवसांपासून एसटी बसेस आगारात उभ्या आहेत. दररोजचे उत्पन्न घटल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा पेच निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्पन्नच बंद असल्याने वेतन कसे दिले जाणार हाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आगामी काळात वेतनाचा मार्ग बिकट होणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

हेही वाचा: पंढरपूर : कार्तिकी वारीसाठी 3289 पोलिस कर्मचारी तैनात

2019 ला 90 लाखांचे उत्पन्न

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून सण, उत्सव, यात्रा, जत्रा यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर प्रशासनांकडून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आषाढी वारी होवू शकली नाही. मात्र कार्तिकी यात्रेस परवानगी देण्यात आली. मात्र एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यामुळे मागील सात दिवसांपूासन एसटीची सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे 2019 मध्ये झालेल्या कार्तिकी एकादशी यात्रेच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाला 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

हेही वाचा: आणि वारकरी आनंदले..! तब्बल वीस महिन्यांनंतर कार्तिकी यात्रा भरणार

2019 ला कार्तिकी यात्रेनिमित्त सोलापूर विभागास चांगले उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे यात्रा न झाल्यामुळे उत्पन्न मिळाले नाही. मात्र यंदाच्या वर्षी कार्तिकी यात्रेनिमित्त गाड्यांचे विभागातून नियोजन करण्यात आले होते. मात्र कर्मचा-यांच्या संपामुळे जवळपास 1 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.

- सुरेश लोणकर, विभागीय सांख्यिकी अधिकारी, सोलापूर

loading image
go to top