esakal | सोलापूर: सायरन वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम! ATM फोडण्याचा प्रयत्न फसला
sakal

बोलून बातमी शोधा

ATM

सदर घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

सायरन वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम! ATM फोडण्याचा प्रयत्न फसला

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

वैराग (सोलापूर): येथील बार्शी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे एटीएम मशीन गॅस कटरने तोडण्याचा प्रयत्न करताना सायरन वाजल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. सदर घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

हेही वाचा: वैराग येथे ऑनलाईन हेल्पलाईनला प्रारंभ !

वैराग ( ता. बार्शी) येथे एफ. एस. एस, कंपनीद्वारा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेलगत एटीएम मशीन बसवण्यात आलेले आहे. बँके शेजारीच असणार्‍या एटीएम मशीनच्या खोलीमध्ये मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करण्यासाठी गॅस कटरने शटरचा पहिला एटीएमचा दरवाजा तोडला. दुसरा दरवाजा गॅस कटरने तोडत असताना मोठ्याने सायरन वाजला, परिसरातील ग्रामस्थांनी आवाज ऐकला. डॉ.हमीद चौधरी यांनी बँकेचे कर्मचारी शशीकांत मोहिते यांच्याशी फोनवर संपर्क केला. शेजारील लोक, कर्मचारी तात्काळ या ठिकाणी हजर झाले. सायनर वाजल्यामुळे व लोकांनी पाहिल्याचे चोरांच्या लक्षात आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी तेथून धुम ठोकली, बँकेबाहेरील सीसीटीव्हीची केबल चोरट्यांनी तोडलेली दिसत आहे.

हेही वाचा: वैराग ते धामणगाव रोडवरील नागझरी नदीवर नवीन पुलासाठी निधी मंजूर : आमदार राऊत

सदर एटीएम साठी कोणत्याही प्रकारचा सुरक्षा गार्ड नेमलेला नाही. एटीएम च्या आत मधील असणाऱ्या कॅमेऱ्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होईल.. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अशी माहिती शाखेचे उपशाखाअधिकारी तुलसी बत्तनी, व रामलिंग चव्हाण यांनी दिली. एटीएम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटना घडून 17 तास उलटले तरी वैराग पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. त्यामुळे पोलिसात गुन्हा नोंद झाला नाही. यापूर्वीही वैरागमध्ये एटीएम फोडिची घटना घडलेली आहे .

loading image
go to top