esakal | मुख्यमंत्र्यांनी कराडकरांची माफी मागावी; अन्यथा आंदोलन - विश्व हिंदू परिषद
sakal

बोलून बातमी शोधा

Karadkar

'मुख्यमंत्र्यांनी कराडकरांची माफी मागावी; अन्यथा आंदोलन !'

sakal_logo
By
अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आरगडे म्हणाले, अगदी इंग्रजांची आणि मुघलांची सत्ता होती, त्या वेळीसुद्धा कधी वारीची परंपरा खंडित झाली नव्हती.

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेच्या पायी वारीची वर्षानुवर्षांची परंपरा महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) खंडित करण्याचे पाप केले आहे. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Senior kirtankar Bandatatya Karadkar) यांना स्थानबद्ध केले आहे. त्यांची सुटका करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी त्यांना देण्यात आलेल्या त्रासाबद्दल माफी मागावी आणि त्यांना सन्मानाने आषाढीच्या पूजेसाठी न्यावे; अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सतीश आरगडे (Vishwa Hindu Parishad's Divisional Minister Satish Argade) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. (The Vishwa Hindu Parishad demanded that the Chief Minister should apologize to Bandatatya Karadkar-ssd73)

हेही वाचा: तिन्हीवेळा कर्जमाफीचा लाभार्थी, तरीही कर्ज मिळत नसल्याची तक्रार

श्री. आरगडे म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही साधू- संतांची आहे आणि पंढरपूरच्या पायी वारीची परंपरा सातशे वर्षांपासून चालत आलेली आहे. अगदी इंग्रजांची आणि मुघलांची सत्ता होती, त्या वेळीसुद्धा कधी वारीची परंपरा खंडित झाली नव्हती. सध्याच्या आघाडी सरकारने मात्र ही वारीची परंपरा खंडित करण्याचे पाप केले आहे. कोरोनाच्या (Covid-19) संक्रमणानंतर आता हॉटेल्स, मॉल्स, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सुरू आहेत. त्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या हजारो लोकांची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करीत आहेत. असे असताना वारकऱ्यांच्या उपासनेच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली जात आहे. कोरोनाचे कारण पुढे करून वारीला विरोध केला जात आहे.

हेही वाचा: पडळकरांच्या गाडीवर दगड मारणाऱ्या अमितने छातीवर गोंदवले शरद पवार !

बंडातात्या कराडकर हे कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून पंढरपूरला पायी येणार होते. परंतु, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येण्यापूर्वी बंडातात्या कराडकर यांची सन्मानपूर्वक मुक्तता करावी आणि त्यांना आदराने पंढरपूर येथे घेऊन यावे. वाखरी येथे पालख्यांच्या सोबत येणाऱ्या वारकऱ्यांना वैभवशाली डामडौलात प्रवेश देण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्री. आरगडे, डॉ. जयसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष रवींद्र साळे, भाग्यश्री लिहिणे, बापू भोळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकार परिषदे वेळी ज्ञानेश्वर महाराज जोगदंड उपस्थित होते.

loading image