विठ्ठल मंदिर समितीने करावे कोरोना नियमांनुसार दर्शनाचे नियोजन

विठ्ठल मंदिर होणार खुले! समितीने करावे कोरोना नियमांनुसार दर्शनाचे योग्य नियोजन
विठ्ठल मंदिर समितीने करावे कोरोना नियमांनुसार दर्शनाचे नियोजन
विठ्ठल मंदिर समितीने करावे कोरोना नियमांनुसार दर्शनाचे नियोजनGallery
Summary

पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्टेशन, बसस्थानक, वाहनतळ या ठिकाणी संबंधित विभागाने आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील धार्मिक स्थळे 7 ऑक्‍टोबरपासून भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल - रुक्‍मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील तसेच परराज्यातील भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. यासाठी विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर (Vitthal - Rukmini Temple) समितीने योग्य नियोजन करून राज्य शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची रेल्वे स्टेशन, बसस्थानक, वाहनतळ या ठिकाणी संबंधित विभागाने आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) यांनी दिल्या.

विठ्ठल मंदिर समितीने करावे कोरोना नियमांनुसार दर्शनाचे नियोजन
'माझी मुलगी कलेक्‍टर होणारच!' वडिलांचे स्वप्न केले साकार

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी सुरू करण्याच्या नियोजनाबाबत नवीन भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी पी. डी. काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलिस निरीक्षक अरुण पवार, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व्ही. एस. भुसे आदी उपस्थित होते.

या वेळी प्रांताधिकारी गजानन गुरव म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी मंदिर समितीने ऑनलाइन, ऑफलाइन दर्शनाबाबत योग्य नियोजन करावे. समितीने दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी व भाविकांची आरोग्य तपासणी करावी. मंदिरात नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही आरोग्य तपासणी करावी. दर्शन रांग, दर्शन मंडप व मंदिराची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये सामाजिक अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच मंदिर परिसरात वैद्यकीय पथकाची नेमणूक करून सुसज्ज रुग्णवाहिका सज्ज ठेवावी. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोणते नियम पाळावेत याबाबत नियमावली फलक लावावेत तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी सूचना द्याव्यात, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबरोबरच दर्शनी भागावर कोरोनाबाबत जनजागृतीपर फलक लावावेत. मंदिर परिसरातील विक्रेत्यांची वेळोवेळी कोरोना चाचणी करून घ्यावी. दुकानात एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी सामाजिक अंतराची वर्तुळे काढण्याबाबत दुकानदारांना सूचना द्याव्यात. अन्न व औषध प्रशासन विभागाने पंढरपूर शहरातील सर्व हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे येथील खाद्यपदार्थांची तपासणी करावी. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने चंद्रभागा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करावे.

विठ्ठल मंदिर समितीने करावे कोरोना नियमांनुसार दर्शनाचे नियोजन
सोलापूर : तरीही मिळेना अहिल्यादेवींच्या अध्यासन केंद्राला निधी

पोलिस प्रशासनाने भाविकांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. दर्शनासाठी शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देऊन भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही श्री. गुरव यांनी या वेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com