esakal | Solapur : बार्शी पोलिस ठाणे आवारातच अल्पवयीन मुलास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न!
sakal

बोलून बातमी शोधा

बार्शी पोलिस ठाणे

पोलिस ठाण्याच्या आवारातच सिमेंटचा गट्टू उचलून अल्पवयीन मुलाच्या डोक्‍यात घालण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला.

बार्शी पोलिस ठाणे आवारातच अल्पवयीन मुलास ठार मारण्याचा प्रयत्न!

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : (Barshi) शहरातील तुळजापूर रोडवरील मांगडे चाळ येथे रविवारी सकाळी झालेल्या भांडणाची तक्रार देण्यास कुटुंबासह अल्पवयीन मुलगा शहर पोलिस ठाण्यात (Barshi City Police Station) आला होता. पोलिस ठाण्याच्या आवारातच सिमेंटचा गट्टू उचलून अल्पवयीन मुलाच्या डोक्‍यात घालण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला असून, बार्शी शहर पोलिसांत त्याच्या विरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: उजनी धरण फुल्ल ! भीमा नदीत 30 हजार क्‍युसेकचा विसर्ग

गणेश विठ्ठल आगलावे (वय 24, रा. मांगडे चाळ, तुळजापूर रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवराज धोत्रे (वय 16, रा. मांगडे चाळ) याने फिर्याद दाखल केली. ही घटना पोलिस ठाण्याच्या आवारात सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली. मांगडे चाळ येथे रविवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान गणेश आगलावे, राहुल नलावडे, हरीश वडेकर यांच्यामध्ये मोठे भांडण व शिवीगाळ धोत्रे यांच्या घरासमोर सुरू होती. यावेळी शिवराज धोत्रे याने "येथे माझ्या घरामध्ये आई, बहीण आहेत, तुम्ही घाण, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू नका' असे सांगताच शिवराज यास गच्ची पकडून "तू फार शहाणा आहेस' म्हणून हाताने मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा: पदभार घेण्यापूर्वीच कराळेंची बदली! सोलापूरच्या पोलिस आयुक्‍तपदी बैजल

घडलेल्या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्यात शिवराज धोत्रे हा आई, बहीण, आत्या यांच्यासह आला होता. त्या वेळी पोलिसांनी समोरची तक्रार सुरू आहे ती झाल्यानंतर तुमची घेतो, तोपर्यंत तुम्ही आवारातील बाकड्यावर बसा, असे सांगितले. त्यानुसार धोत्रे कुटुंबीय पोलिस ठाण्याच्या आवारात तेथे बसले होते. तेव्हा तेथे गणेश आगलावे आई- वडिलांसह आला होता. धोत्रे कुटुंबीयांच्या शेजारील बाकड्यावर ते बसले होते. गणेशने शिवराजकडे पाहून रागाने मान हलवून "तुला बघतोच' असे म्हणून उठला व बाजूला असलेला सिमेंटचा गट्टू शिवराजच्या डोक्‍यात घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवराज मोठ्याने ओरडून पळाला. त्या वेळी डाव्या पायावर गट्टू पडून गंभीर जखम झाली, आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शिरसट करीत आहेत.

loading image
go to top