esakal | कामगारांनो, तुम्हाला माहिती आहेत का "ईएसआय'चे फायदे ? कामगार विमा योजनेतून मिळतात सहा प्रकारचे लाभ ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Esic

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत राज्यभरातून दरवर्षी सुमारे तेराशे कोटी रुपये जमा होतात. या सर्व रुग्णालयांमधील खाटांची संख्या तीन हजारांपर्यंत असून, त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. दरम्यान, संकट काळात हजारो कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना राज्य विमा कामगार योजनेचा लाभ झाला आहे. राज्य विमा कामगार योजनेचे असे आहेत फायदे... 

कामगारांनो, तुम्हाला माहिती आहेत का "ईएसआय'चे फायदे ? कामगार विमा योजनेतून मिळतात सहा प्रकारचे लाभ ! 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यभरात एकूण 14 कामगार विमा रुग्णालये असून, तब्बल 24 लाख कामगारांची नोंदणी राज्य विमा कामगार योजनेअंतर्गत झाली आहे. कामगारांच्या सुमारे 21 लाख सदस्यांचीही नोंदणी कामगार विमा रुग्णालयांकडे आहे. कामावर असताना अपघात तथा मृत्यू झाल्यानंतर, गर्भवती महिलांना प्रसूतीच्या काळात, काम करताना अवयव निकामी झाल्यानंतर, नैसर्गिक आपत्तीमुळे नोकरीवर गदा आल्यास, राज्य विमा कामगार योजनेअंतर्गत सहा प्रकारचे लाभ दिले जात आहेत. 

राज्यात नागपूर, कांदिवली, मुलूंड, ठाणे, वाशी, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, औंध, चिंचवड, पुणे, कोल्हापूर, वरळी आणि उल्हासनगर येथे राज्य कामगार विमा रुग्णालये आहेत. राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत राज्यभरातून दरवर्षी सुमारे तेराशे कोटी रुपये जमा होतात. या सर्व रुग्णालयांमधील खाटांची संख्या तीन हजारांपर्यंत असून, त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. दरम्यान, संकट काळात हजारो कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना राज्य विमा कामगार योजनेचा लाभ झाला आहे. 

लाभ घेण्यासाठी लक्षात ठेवा... 
ज्या आस्थापनेत दहा तथा दहापेक्षा अधिक कामगार आहेत, त्यांना विमा योजनेतून लाभ मिळतो. त्यासाठी संबंधित कंपनीकडे आपली नोंदणी असायला हवी. तसेच आपण काम करीत असलेल्या कंपनीकडून कामगार विमा रुग्णालयाचे कार्ड मिळाल्यानंतर ज्या रुग्णालयातून आपण उपचार घेणार आहोत, त्या ठिकाणच्या डॉक्‍टरांकडे संबंधित कार्डची नोंदणी करावी. त्यानंतर त्या कामगाराला राज्य कामगार विमा योजनेतील सर्व प्रकारचे लाभ घेता येतात. 

सहा प्रकारचे "असे' घ्या लाभ 

 • (मेडिकल बेनिफिट) : नोंदणीकृत कामगारांसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मिळतात राज्य कामगार विमा रुग्णालयातून मोफत उपचार 
 • (फिटनेस बेनिफिट) : प्रसूती काळात व प्रसूतीनंतर देय रजेच्या 70 टक्‍के पगार संबंधित महिलेला दिला जातो 
 • (डिपेंडंट बेनिफिट) : कामावर असताना मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या पत्नीस पगाराच्या तुलनेत 60 टक्‍के पेन्शन तर मुलास मिळते 40 टक्‍के पेन्शन 
 • (परमनंट डिसेबल बेनिफिट) : काम करताना बोट, डोळा, पाय तथा अन्य अवयव निकामी झाल्यास एकूण पगाराच्या पाच टक्‍के रक्‍कम पेन्शन म्हणून मिळते 
 • (अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना) : नोकरी गेल्यानंतर मिळतो तीन महिन्यांचा 50 टक्‍के पगार 
 • (मॅटर्निटी बेनिफिट) : कामावर असताना मृत्यू झालेल्या कामगाराच्या अंत्यविधीसाठी दिले जातात 15 हजार रुपये 

ठळक बाबी... 

 • कामगार विमा योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मिळतात मोफत उपचार 
 • फिटनेस बेनिफिट अंतर्गत नऊ महिन्यांनंतर कामगारांना मिळतो देय रजेतील 70 टक्‍के रकमेचा लाभ 
 • कामावर असताना मृत्यू झालेल्या कामगाराच्या पत्नीस वेतनाच्या तुलनेत 60 टक्‍के तर मुलांना मिळते 40 टक्‍के पेन्शन 
 • कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात वंध्यत्व आल्यास मिळते पगारीच्या तुलनेत पाच टक्‍के पेन्शन 
 • कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत मिळतात 15 हजार रुपये 
 • नोकरी गेल्यानंतर अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजनेतून संबंधित कामागाराला मिळते तीन महिन्यांचे 50 टक्‍के वेतन 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

महाराष्ट्र 

loading image